नवी दिल्ली - आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत विनेश फोगाट आणि साक्षी मलिक या भारतीय महिला कुस्तीपटूंनी कांस्य पदकांची कमाई केली. विनेशने ५३ तर साक्षीने ६२ किलो वजनी गटात हे यश मिळवले आहे.
५० किलो वजनी गटात आशियाई क्रीडा स्पर्धेत आणि राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक विजेती असलेली विनेश फोगाट या स्पर्धेत ५३ किलो वजनी गटात सहभागी झाली होती. क्वार्टर फायनलमध्ये जापानच्या मायु मुकाइदाने १०-० ने पराभूत केले होते. मात्र विनेशला रेपेचेज राउंड खेळण्याची संधी भेटली. या राउंडमध्ये विनेशने चायनीज तैपईच्या जो चियला ६-० ने पराभूत केले. यानंतर कांस्य पदकासाठी झालेल्या सामन्यात विनेशने कियानयू पांगवर ८-१ असा विजय मिळवला.
साक्षीने प्लेऑफ मध्ये कोरियाच्या जियाए चोईला ११-० ने पराभूत करत कांस्य पदकासाठीच्या सामन्यात जागा मिळवली. ज्यात तिने उत्तर कोरियाच्या ह्य़ोन ग्याँग मूनला परवत कांस्यपदकावर नाव कोरले. या स्पर्धेत भारतीय महिला कुस्तीपटूंना एकही सुवर्णपदक जिंकता आले नाही.