ETV Bharat / sports

जामखेडच्या सागर होगाडेने केले सलग पाचव्यांदा भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व

सागर नंदकिशोर होगाडे या जामखेडसारख्या छोट्याश्या गावातील खेळाडूने सलग चौथ्यांदा भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करून एक नवा विक्रम नोंदवला आहे. निमित्त होते, १५  ते २० नोव्हेंबर दरम्यान दुबई येथे पार पडलेल्या आशियाई थ्रोबॉल स्पर्धांचे. सलग पाचवेळा भारतीय संघात निवड होऊन थेट संघाचे कर्णधारपदच भुषविणारा हा खेळाडू कमालीचा खेळवेडा आहे.

author img

By

Published : Dec 3, 2019, 2:02 PM IST

Sagar Hogade of Jamkhed represented India for the fifth time in a row in throw ball
जामखेडच्या सागर होगाडेने केले सलग पाचव्यांदा भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व

पुणे - थ्रोबॉल सारखा खेळ आधीच समजून घ्यायला किचकट. खेळायला तर त्याहून कठीण. प्रशिक्षणासाठी गुणवत्ता असलेल्या प्रशिक्षकांचा अभाव, सोयीसुविधा अतिशय कमी दर्जाच्या किंबहुना दर्जाच नसलेल्या. लोकप्रियतेचं ज्या खेळाशी काहीही नातं नाही असा हा खेळ. तरीही एखाद्या खेळाडूला हाच खेळ खेळावसं वाटणं हे म्हणजे त्या खेळाडूचं विशिष्ट खेळाप्रति असलेलं प्रेम.

सागर होगाडेने

हेही वाचा - मेस्सीचं धूमशान...सहाव्यांदा पटकावला ‘बलोन डी ओर’ पुरस्कार

सागर नंदकिशोर होगाडे या जामखेडसारख्या छोट्याश्या गावातील खेळाडूने सलग चौथ्यांदा भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करून एक नवा विक्रम नोंदवला आहे. निमित्त होते, १५ ते २० नोव्हेंबर दरम्यान दुबई येथे पार पडलेल्या आशियाई थ्रोबॉल स्पर्धांचे. सलग पाचवेळा भारतीय संघात निवड होऊन थेट संघाचे कर्णधारपदच भुषविणारा हा खेळाडू कमालीचा खेळवेडा आहे. महाविद्यालयीन जीवनात पहिल्यांदा हा खेळ खेळायला सुरुवात झाली. या खेळासाठी अत्यंत आवश्यक असणारी गोष्ट म्हणजे पुरेशी उंची, ती सागरला निसर्गतःच मिळाली आहे. शिवाय दोन्ही हातांनी तितकाच जोरदार प्रहार करता येण्याची क्षमता, या त्याच्या जमेच्या बाजू आहेत. याला आधार होता तो त्याच्या तंदरुस्त शरीराचा. या गोष्टींमुळे त्याचा खेळ इतका बहरत गेला की पाहिल्याच वर्षी त्याची महाराष्ट्र संघात वर्णी लागली. काही काळ महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधीत्व करून त्याने गोव्यासारख्या छोट्या राज्यात हा खेळ रुजवला. पुढे याच राज्याचा कर्णधार आणि प्रशिक्षक पदाचा अतिरिक्त भार सांभाळून तो थेट भारतीय संघात दाखल झाला.

दिल्ली, पंजाब, मध्यप्रदेश, हरियाणा, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, अशा वेगवेगळ्या राज्यांत आपल्या जादुई खेळाच्या जोरावर त्याने कित्येकांना आपल्या खेळाकडे आकर्षित केले. तसेच नेपाळ, श्रीलंका, मलेशिया, येथे आपल्या संघाला अनुक्रमे दोनदा विजेता आणि एकदा उपविजेता करण्यात अत्यंत मोलाची भूमिका त्याने बजावली.

'मला या सबंध प्रवासात माझे आईवडील, गोवा थ्रोबॉल असोसिएशन, थ्रोबॉल फेडरेशन ऑफ इंडिया यांची विशेष साथ आणि प्रोत्साहन लाभले' असे, अभिमानाने सांगताना तो त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. ही निसर्गदत्त खेळी अजून बहरत जाण्यासाठी अपार कष्ट करण्याची त्याची तयारी बघता सागर हा थ्रोबॉलच्या दुनियेत अजून बरंच काही मिळवेल यात शंका नाही. त्याच्या या कामगिरीबद्दल त्याचे सर्वत्र कौतूक होत आहे.

Intro:Body:

Sagar Hogade of Jamkhed represented India for the fifth time in a row in throw ball

Sagar Hogade of Jamkhed news, 'थ्रोबॉल'च्या दुनियेतला 'सागर' न्यूज, throw ball Sagar Hogade news, Sagar Hogade latest news, थ्रोबॉल सागर होगाडे न्यूज

जामखेडच्या सागर होगाडेने केले सलग पाचव्यांदा भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व    

पुणे - थ्रोबॉल सारखा खेळ आधीच समजून घ्यायला किचकट. खेळायला तर त्याहून कठीण. प्रशिक्षणासाठी गुणवत्ता असलेल्या प्रशिक्षकांचा अभाव, सोयीसुविधा अतिशय कमी दर्जाच्या किंबहुना दर्जाच नसलेल्या. लोकप्रियतेचं ज्या खेळाशी काहीही नातं नाही असा हा खेळ. तरीही एखाद्या खेळाडूला हाच खेळ खेळावसं वाटणं हे म्हणजे त्या खेळाडूचं विशिष्ट खेळाप्रति असलेलं प्रेम.

हेही वाचा - 

सागर नंदकिशोर होगाडे या जामखेडसारख्या छोट्याश्या गावातील खेळाडूने सलग चौथ्यांदा भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करून एक नवा विक्रम नोंदवला आहे. निमित्त होते, १५  ते २० नोव्हेंबर दरम्यान दुबई येथे पार पडलेल्या आशियाई थ्रोबॉल स्पर्धांचे. सलग पाचवेळा भारतीय संघात निवड होऊन थेट संघाचे कर्णधारपदच भुषविणारा हा खेळाडू कमालीचा खेळवेडा आहे. महाविद्यालयीन जीवनात पहिल्यांदा हा खेळ खेळायला सुरुवात झाली. या खेळासाठी अत्यंत आवश्यक असणारी गोष्ट म्हणजे पुरेशी उंची, ती सागरला निसर्गतःच मिळाली आहे. शिवाय दोन्ही हातांनी तितकाच जोरदार प्रहार करता येण्याची क्षमता, या त्याच्या जमेच्या बाजू आहेत. याला आधार होता तो त्याच्या तंदरुस्त शरीराचा. या गोष्टींमुळे त्याचा खेळ इतका बहरत गेला की पाहिल्याच वर्षी त्याची महाराष्ट्र संघात वर्णी लागली. काही काळ महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करून त्याने गोव्यासारख्या छोट्या राज्यात हा खेळ रुजवला. पुढे याच राज्याचा कर्णधार आणि प्रशिक्षक पदाचा अतिरिक्त भार सांभाळून तो थेट भारतीय संघात दाखल झाला.

 दिल्ली, पंजाब, मध्यप्रदेश, हरियाणा, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, अशा वेगवेगळ्या राज्यांत आपल्या जादुई खेळाच्या जोरावर त्याने कित्येकांना आपल्या खेळाकडे आकर्षित केले. तसेच नेपाळ, श्रीलंका, मलेशिया, येथे आपल्या संघाला अनुक्रमे दोनदा विजेता आणि एकदा उपविजेता करण्यात अत्यंत मोलाची भूमिका त्याने लिलया बजावली. 

'मला या सबंध प्रवासात माझे आईवडील, गोवा थ्रोबॉल असोसिएशन, थ्रोबॉल फेडरेशन ऑफ इंडिया यांची विशेष साथ आणि प्रोत्साहन लाभले' असे, अभिमानाने सांगताना तो त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. ही निसर्गदत्त खेळी अजून बहरत जाण्यासाठी अपार कष्ट करण्याची त्याची तयारी बघता सागर हा थ्रोबॉलच्या दुनियेत अजून बरंच काही मिळवेल यात शंका नाही. त्याच्या या कामगिरीबद्दल  त्याचे सर्वत्र कौतूक होत आहे. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.