दोहा : सेनेगालीचा फुटबॉलपटू सॅडियो माने पायाच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया करून ( Sadio Mane Undergoing Surgery For a Leg Injury ) विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडला आहे. बायर्न म्युनिक आणि सेनेगल फुटबॉल फेडरेशनने ही माहिती दिली. बायर्नने जारी केलेल्या निवेदनानुसार, 30 वर्षीय माने यांच्या उजव्या पायावर शुक्रवारी रात्री उशिरा ऑस्ट्रियातील इन्सब्रक येथे शस्त्रक्रिया करण्यात आली. 8 नोव्हेंबरला जर्मन लीगमधील वेर्डर ब्रेमेनविरुद्धच्या सामन्यात त्याला ही ( Sadio Mane 92 Matches For Senegal and Scored 33 Goals ) दुखापत झाली होती.
-
ℹ️ Sadio Mané underwent successful surgery in Innsbruck on Thursday evening. He will therefore no longer be available to play for Senegal at the World Cup.
— FC Bayern Munich (@FCBayernEN) November 17, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
All the best for your recovery, Sadio! ❤️
">ℹ️ Sadio Mané underwent successful surgery in Innsbruck on Thursday evening. He will therefore no longer be available to play for Senegal at the World Cup.
— FC Bayern Munich (@FCBayernEN) November 17, 2022
All the best for your recovery, Sadio! ❤️ℹ️ Sadio Mané underwent successful surgery in Innsbruck on Thursday evening. He will therefore no longer be available to play for Senegal at the World Cup.
— FC Bayern Munich (@FCBayernEN) November 17, 2022
All the best for your recovery, Sadio! ❤️
सॅडियो माने विश्वचषकात सेनेगलचे प्रतिनिधित्व करणार नाही : बायर्नने सांगितले की, एफसी बायर्नचा हा आघाडीचा खेळाडू यापुढे विश्वचषकात सेनेगलचे प्रतिनिधित्व करण्यासाठी उपलब्ध राहणार नाही. पुढील काही दिवसांत म्युनिकमध्ये त्याचे पुनर्वसन (उपचारातून बरे) सुरू करेल. सेनेगल संघाचे डॉक्टर मॅन्युएल अफोंसो यांनी याआधी माने विश्वचषकातील काही सामन्यांमध्ये खेळेल, अशी आशा व्यक्त केली होती. पण, आता तशी शक्यता नाही.
सॅडियो मानेच्या एमआरआय रिपोर्टनुसार दुखापतीत अजून सुधारणा नाही : ते म्हणाले, आजचा एमआरआय आम्ही पाहिला असून, दुर्दैवाने त्यांची प्रगती अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. सेनेगलचा संघ सोमवारी नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्याने विश्वचषकातील आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. यानंतर अ गटातील संघासमोर यजमान आणि इक्वेडोरचे आव्हान असेल.