नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना ९ फेब्रुवारीपासून नागपुरात खेळवला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या सत्रात भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवर अनुभवी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर खूपच खूश आहे. त्याच्या या आनंदामुळे त्याने सोशल मीडियावर ट्विट केले आहे. सचिन तेंडुलकरने ट्विटमध्ये कर्णधार रोहित शर्मा, रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विनचे खूप कौतुक केले आहे. त्याने या तिन्ही खेळाडूंना भारतीय क्रिकेटचे त्रिकुट म्हटले आहे. सचिन तेंडुलकर म्हणतो की, या त्रिकुटाने टीम इंडियाला पहिल्या कसोटीत धार मिळवून दिली.
-
𝐑𝐑𝐑 💥 🔥
— Sachin Tendulkar (@sachin_rt) February 10, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
The trio of Rohit, Ravindra & Ravichandran have helped India get ahead in this Test.@ImRo45 has led from the front with his 100 while @ashwinravi99 & @imjadeja have got us important breakthroughs.#INDvAUS pic.twitter.com/JTipYmxpKt
">𝐑𝐑𝐑 💥 🔥
— Sachin Tendulkar (@sachin_rt) February 10, 2023
The trio of Rohit, Ravindra & Ravichandran have helped India get ahead in this Test.@ImRo45 has led from the front with his 100 while @ashwinravi99 & @imjadeja have got us important breakthroughs.#INDvAUS pic.twitter.com/JTipYmxpKt𝐑𝐑𝐑 💥 🔥
— Sachin Tendulkar (@sachin_rt) February 10, 2023
The trio of Rohit, Ravindra & Ravichandran have helped India get ahead in this Test.@ImRo45 has led from the front with his 100 while @ashwinravi99 & @imjadeja have got us important breakthroughs.#INDvAUS pic.twitter.com/JTipYmxpKt
सचिन तेंडुलकरची ट्विटर हॅंडलवर पोस्ट : सचिन तेंडुलकरने त्याच्या ट्विटर हँडलवरून एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये लिहिले आहे की, 'या कसोटी सामन्यात रोहित, रवींद्र आणि रविचंद्रन या त्रिकुटाने भारताला खूप मदत केली आहे. नागपुरात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ चमकदार कामगिरी करीत आहे. रोहित शर्मा, आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी झंझावाती खेळी खेळून ऑस्ट्रेलियाला कसोटी क्रिकेटमध्ये बॅकफूटवर आणले आहे. यामुळे मास्टर ब्लास्टर तेंडुलकरच्या आनंदाला थारा नव्हता. पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी जडेजा आणि अश्वनी या जोडीला खेळवल्याने टीम इंडियाला मजबूत स्थितीत पोहोचण्यात खूप मदत झाल्याचे तो म्हणतो.
आज 'R' नावाची जादू चालली : दोन्ही खेळाडूंनी मिळून 8 विकेट घेत ऑस्ट्रेलिया संघाला 177 धावांत रोखले. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या रोहित शर्माने शतक झळकावत टीम इंडियाला पुढे जाण्यास मदत केली आहे. रोहित शर्मा, रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन या त्रिकुटाच्या या धमाकेदार कामगिरीने सचिन तेंडुलकर खूप खूश आहे. त्यामुळेच त्याने या तिन्ही खेळाडूंचे टीम इंडियाचे 'RRR' असे वर्णन केले आहे.
भारतीय संघाचा शानदार विजय : भारताने 400 धावांवर डाव घोषित केल्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेला ऑस्ट्रेलियाचा संघ दयनीय स्थितीत पोहचली. रविचंद्रन अश्विनची फिरकीची जादू काही थांबायचे नाव घेत नाही. अश्विनने ऑस्ट्रेलिया संघाची वरची फळी अक्षरशः कापून काढली. त्यानंतर उरलेली कामगिरी जडेजा आणि शमीने चोख बजावत उरले-सुरलेले फलंदाज तंबूत पाठवले. ऑस्ट्रेलिया अवघ्या 91 धावांवर ऑलआऊट होऊन भारताचा 132 धावांना दणदणीत विजय झाला आहे.
कांगारूंनी अक्षरशः नांगी टाकली : आज कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारताने 400 धावांवर डाव घोषित केल्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाची पुरती गाळण उडवली. भारतीय गोलंदाजांपुढे कांगारुंनी अक्षरश: नांगी टाकली. ऑस्ट्रेलियाचा सर्व संघ अवघ्या 91 धावांवर ऑलआऊट झाला. भारताचा 132 धावांनी दणदणीत विजय झाला.
भारतीय गोलंदाजांची शानदार कामगिरी : ऑस्ट्रेलियन फलंदाज एकामागोमाग तंबूत परतत होते. इकडे रविचंद्रन अश्विनच्या माऱ्यापुढे कांगारू हैराण झाले होते. डेव्हीड वाॅर्नरला रविचंद्रनने एलबीडब्ल्यू केल्यानंतर तिकडे जडेजानेसुद्धा मारनेस लबुनशेनला पायचीत केले. मॅट रेनशाॅ ( 2) अवघ्या 2 धावांवर अश्विनकडून पायचित झाला. पेटर हॅंडकोम्बलासुद्धा काही सुधारले नाही, तो 6 धावांवर असताना अश्विनने त्याला एबबीडब्ल्यू केले. एलेक्स केरी (10) सुद्धा एलबीडब्ल्यू करून तंबूत पाठवले. त्यानंतर जडेजा, शमी, यांनीसुद्धा त्यांची कामगिरी चोख बजावत बाकीच्या फलंदाजांना पॅव्हीलीनचा रस्ता दाखवला.