मॉस्को - उत्तेजक प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी जागतिक उत्तेजक द्रव प्रतिबंधक संस्थेने (वाडा) रशियावर चार वर्षांसाठी बंदी घालण्याचा निर्णय घेतला. या बंदीला शुक्रवारी रशियन उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने (रुसाडा) आव्हान दिले आहे. 'रुसाडा'चे महासंचालक युरी गानस यांनी याची माहिती दिली.
काय आहे प्रकरण -
डोपिंगबाबत चुकीचा तपशील पुरवल्याने, जागतिक उत्तेजक द्रव प्रतिबंधक संस्थेने (वाडा) रशियावर चार वर्षांसाठी बंदी घालण्याचा निर्णय घेतला. या बंदीमुळे रशिया हा देश आता पुढील चार वर्षांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व प्रकारच्या खेळांतून बाद ठरला आहे. महत्त्वाचे म्हणजे पुढील वर्षात टोकियोमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक २०२० मध्ये आणि २०२२ च्या फुटबॉल विश्वकरंडकामध्ये रशियातील खेळाडूंना खेळता येणार नाही.
रशिया वाडाच्या या निर्णयाला २१ दिवसात आव्हान देऊ शकत होता. तेव्हा रशियाने शुक्रवारी याला आव्हान आहे. यामुळे हे प्रकरण आता स्वित्झर्लंडमधील क्रीडाविषयक आंतरराष्ट्रीय लवादापुढे सुनावणीसाठी ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, ही बंदी राजकीय दृष्टय़ा प्रेरित असून, त्याला कायदेशीर आव्हान दिले जाणार आहे, असे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी म्हटले होते.
हेही वाचा - रशियाला 'वाडा'चा दणका, ऑलिम्पिकसह फुटबॉल विश्वकरंडकातून पत्ता कट
हेही वाचा - सलाम मातृत्वाला..! लाईव्ह सामन्यादरम्यान महिला खेळाडूने बाळाला पाजलं दूध, फोटो व्हायरल