हैदराबाद - शेवटपर्यंत रंगलेल्या अटातटीच्या सामन्यात बेंगलुरु बुल्सने तीन वेळा चॅम्पियन असलेल्या पाटणा पायरेट्सचा 2 गुणांनी पराभव केला. हा रोमांचक सामना हैदराबादच्या गच्चीबावली इंडोर स्टेडियममध्ये रंगला होता.
पहिल्या हाफमध्ये बेंगलुरु बुल्सचा संघ 4 गुणांनी पिछाडीवर होता. मात्र, दुसऱ्या हाफमध्ये बुल्सच्या खेळाडूंनी चांगली वापसी केली. बेंगलुरु बुल्स पहिल्या हाफमध्ये 17-13 ने पिछाडीवर होती. तर दुसऱ्या सेटमध्ये चांगला खेळ करत सामन्यात 34-32 ने पाटणा पायरेट्सचा पराभव केला.
बेंगलुरु बुल्ससाठी पवन सहरावत याने 9 आणि अमित शेरान याने 5 गुण मिळवले. तर पाटना पायरेट्सचा कर्णधार प्रदिप नरवाल याने 10 मोहम्मद इस्माईल मगसोदलुने 9 गुण मिळवले. सामन्याच्या दुसऱया हाफमध्ये पाटणा पायरेट्सच्या खेळांनी गचाळ कामगिरी केल्याने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.