ETV Bharat / sports

63 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी आखाडे सज्ज

63 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेची तयारी पूर्ण झाली आहे. गुरुवारी सकाळपासून राज्यातील ४४ जिल्ह्यांमधून पहिलवानांचे आगमन सुरू झाले. ९०० ते ९५० पहिलवान आणि १२५ पंच या स्पर्धेसाठी बालेवाडी येथे दाखल झाले आहेत.

author img

By

Published : Jan 3, 2020, 8:09 AM IST

आखाडे सज्ज
आखाडे सज्ज

पुणे - 63 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी पुण्यातील बालेवाडीमधील शिवछत्रपती क्रीडा संकुल सज्ज झाले आहेत. मातीवरील कुस्तीसाठी २ आणि मॅटवरील कुस्तीसाठी २ आखाडे स्पर्धेच्या ठिकाणी तयार करण्यात आले आहेत.

महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी आखाडे सज्ज

मावळ आणि मूळशी भागातील डोंगरांवरून चांगल्या प्रतीची ४० ब्रास माती आणून २०-२० ब्रासचे दोन आखाडे तयार करण्यात आले आहेत. या मातीत एक हजार लिंबू, २५० किलो हळद, ५० किलो कापूर, रोज शंभर लीटर ताक आणि ६० लीटर तेल घालून आखाडे तयार केले आहेत.

कुस्तीगीरांना स्पर्शातून किंवा जखमांतून कोणत्याही प्रकारच्या आजारांची लागण होऊ नये, म्हणून ही खबरदारी घेण्यात आली आहे. ४० बाय ४० चे रिंगण आणि ३० बाय ३० चा प्रत्यक्ष खेळाचा भाग अशाप्रकारे हे चारही आखाडे आहेत. आखाड्यांचा मुख्य मंच ६० बाय २१० फुटांचा असून त्या बाहेर १० फुटाचा भाग पंचांसाठी आणि पहिलवानांच्या तयारीसाठी ठेवण्यात आला आहे.

हेही वाचा - विराटने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी बदलला लुक, पाहा फोटो

ही स्पर्धा दहा वजनी गटात होणार आहे. गुरुवारी सकाळपासून राज्यातील ४४ जिल्ह्यांमधून पहिलवानांचे आगमन सुरू झाले. ९०० ते ९५० पहिलवान आणि १२५ पंच या स्पर्धेसाठी बालेवाडी येथे दाखल झाले आहेत.

३ जानेवारी २०२०चे वेळापत्रक -

सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत कुस्ती स्पर्धा ‘अ’ विभाग (५७ व ७९ किलो वजनी गट)

दुपारी १२ ते १ वैद्यकीय तपासणी ‘ब’ विभाग (६१,७० व८६ किलो)

दुपारी ४ ते सायंकाळी ६ वाजेदरम्यान उपांत्य आणि अंतिम फेरीच्या लढती ‘अ’ व ‘ब’ विभाग (५७, ६१,७०, ७९ आणि ८६ किलो वजनी गट)

Intro:महाराष्ट्र केसरी साठी चार आखाडे सज्जBody:mh_pun_05_ressling_ ring_preparation_maharashtra_kesari_av_7201348

anchor
शक्ती आणि युक्तीचा संगम असलेल्या कुस्ती या खेळाची भव्यता आणि लोकप्रियतेची प्रचिती महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी पुण्यातील बालेवाडी इथल्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात सज्ज झालेले आखाडे बघून येते. मातीवरील कुस्तीसाठी २ आणि मॅटवरील कुस्तीसाठी २ आखाडे स्पर्धेच्या ठिकाणी सज्ज झाले आहेत. येथे मावळ आणि मुळशी भागातील डोंगरांवरून चांगल्या प्रतीची ४० ब्रास माती आणून २०-२० ब्रासचे दोन आखाडे तयार करण्यात आले आहेत. या मातीत १००० लिंबू, २५० किलो हळद, ५० किलो कापूर, रोज १०० लीटर ताक आणि ६० लीटर तेल घालून मातीचे आखाडे तयार झाले आहेत. पहिलवानांना स्पर्शांतून, जखमातून कोणत्याही प्रकारचे आजार किंवा लागण होऊ नये म्हणून ही खबरदारी घेण्यात येत असते. ४० बाय ४० चे रिंगण व ३० बाय ३० चा प्रत्यक्ष खेळाचा भाग अशा प्रकारे हे चारही आखाडे तयार आहेत. आखाड्यांचा हा मुख्य मंच ६० बाय २१० फुटांचा असून त्या बाहेर १० फुटाचा भाग पंचांसाठी व त्या बाहेर १० फुट भाग पहिलवानांच्या तयारीसाठी सज्ज करण्यात आला आहे. गुरुवारी सकाळ पासून राज्यातील ४४ जिल्ह्यांमधून पहिलवानांचे आगमन सुरू झाले असून तब्बल ९०० ते ९५० कुस्तीगीर आणि १२५ पंच या स्पर्धेसाठी बालेवाडी येथे दाखल झालेत.

शुक्रवार दिनांक ३ जानेवारी २०२०चे वेळापत्रक पुढील प्रमाणे : -

- सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत कुस्ती स्पर्धा ‘अ’ विभाग (५७ व ७९ किलो)

- दुपारी १२ ते १ वैद्यकीय तपासणी व वजने ‘ब’ विभाग (६१,७० व८६ किलो)

- दुपारी ४ ते सायंकाळी ६ वाजेदरम्यान उपांत्य व अंतिम फेरीच्या लढती ‘अ’ व ‘ब’ विभाग (५७, ६१,७०, ७९ व८६किलो)
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.