भोपाळ - महाराष्ट्राचा जलतरणपटू वीरधवल खाडेने राष्ट्रीय स्विमिंग चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. मध्यप्रदेश येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत आज संध्याकाळी ५ वाजता अंतिम फेरी पार पडणार आहे.
मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ येथे सुरु असलेल्या या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी अनेक इव्हेंट पार पडले. या प्रत्येक इव्हेंटच्या आठ जलतरणपटूंना अंतिम फेरीत स्थान प्राप्त झाले आहे. पुरुषांच्या ५० मीटर फ्री स्टाईल प्रकारात महाराष्ट्राचा मिहीर आणि वीरधवल यांचा अंतिम फेरीत प्रवेश झाला आहे.
पुरुष वर्गाच्या २०० मीटर बॅक स्ट्रोकमध्ये अरविंद मनी तमिळनाडूचा सेतु, दिल्लीचा अनुराग, कर्नाटकचा शिवा, मध्यप्रदेशचा नानक मूलचंदानी यांचा समावेश आहे. तर, महिलांच्या २०० मीटर बॅक स्ट्रोकमध्ये महाराष्ट्राची युगा अंतिम फेरीत दाखल झाली आहे. तर, रिझर्व्ह प्रकारात साधवीने स्थान मिळवले आहे.