चेन्नई - भारतीय खेळाडू फक्त क्रिकेटच्या माध्यमातूनच नाहीतर अन्य मार्गातूनही पैसे कमावतात. भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी हा सर्वात श्रीमंत खेळाडूंमध्ये मोडला जातो. धोनी हा अनेक कंपन्यांसाठी ब्रँड अँम्बेसेडर म्हणून काम करत असून, त्यातून तो करोडो रुपयांची कमाई करतो. त्याच्याशिवाय त्याची अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक देखील आहे. आता महेंद्र सिंह धोनीने चेन्नई स्थित गरुडा एरोस्पेस या ड्रोन तयार करणाऱ्या कंपनीत गुंतवणूक केली आहे. तसेच, तो या कंपनीचा ब्रँड अँम्बेसेडर सुद्धा असणार ( MS Dhoni Buy Share Drone Compnay Garuda ) आहे.
या ड्रोन कंपनीने सांगितल्यानुसार, धोनीने म्हटले आहे की तो गरुडा एरोस्पेस कंपनीचा सहभागी झाल्यामुळे आनंदित आहे. कंपनीच्या वाढता आलेख पाहण्यासाठी मी उत्सुक आहे. दरम्यान, धोनीने कंपनीत किती रुपयांची गुंतवणूक केली आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही आहे. तर, गरुडा कंपनीचे संस्थापक अग्निश्वर जयप्रकाश म्हणाले, कंपनी जुलै अखेपर्यंत 30 मिलीयन अमेरिकन डॉलर्सची रक्कम उभारणार आहे.
गरुडा एरोस्पेस या कंपनीची सुरुवात 2015 साली झाली होती. 26 शहरांतून कार्यरत असलेली ही कंपनी 300 ड्रोन आणि 500 वैमानिकांसह सज्ज आहे. कंपनी स्वच्छता, कृषी स्प्रे, मॅपिंग, उद्योग, सुरक्षेसाठी आणि पाळत ठेवण्यासाठी अशा 38 प्रकारांसाठी ड्रोन डिझायन करते.
हेही वाचा - Rafael Nadal : लाल मातीचा बादशाह राफेल नदालने जिंकली 22 वी ग्रँडस्लँम स्पर्धा