नवी दिल्ली - भारतीय बॉक्सिंग फेडरेशनने (बीएफआय) देशातील बॉक्सिंगपटूंसाठी मानसिक फिटनेस सत्राचे आयोजन केले होते.या सत्रात सुमारे ३७४ बॉक्सर आणि प्रशिक्षक उपस्थित होते. असे सत्र घेणारी बीएफआय ही देशातील पहिली राष्ट्रीय क्रीडा संस्था ठरली आहे. फोर्टिस नॅशनल मेंटल हेल्थ प्रोग्रामचे डायरेक्टर डॉ. समीर पारीख आणि फोर्टिस हेल्थकेअरच्या स्पोर्ट्स मानसोपचारतज्ञ दिव्या जैन यांनी या सत्राचे आयोजन केले होते.
या सत्रादरम्यान सामन्याच्या दिवशी भीती वाटणे, प्रशिक्षकाच्या अनुपस्थितीत प्रशिक्षण आणि अनिश्चिततेच्या वेळी स्वतःची काळजी कशी घ्यावी यासारख्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. “हे अत्यंत महत्वाचे आहे की अशा वेळी बीएफआय मानसिक शक्ती आणि आरोग्यावर जोर देत आहे. ही एक चांगली सुरुवात आहे जी सर्व स्तरावर आयोजित करणे आवश्यक आहे,” असे पारीख म्हणाले.
दिव्या जैन म्हणाल्या, “खेळ व इतर क्षेत्रातील यश फक्त आपल्या तांत्रिक कौशल्यावर आधारित नाही तर मानसिक स्थिती देखील आवश्यक आहे. जेणेकरून खेळाडू म्हणून तुम्ही लक्ष केंद्रित करू शकता.”