ETV Bharat / sports

कजाकिस्थानमध्ये तिरंगा फडकला, मनमाडच्या शुभमला कुस्तीत सुवर्णपदक

author img

By

Published : Jun 24, 2022, 9:38 AM IST

Updated : Jun 24, 2022, 2:58 PM IST

मनमाडच्या शुभम अचपळे या युवकाने ४८ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले आहे.कजाकिस्थान येथे सुरु असलेल्या एशियन चॅम्पीयन कुस्ती ( asian champion wrestling ) स्पर्धेत त्याने भारताचा तिरंगा फडकला आहे. या कामगिरीमुळे नाशिक जिल्ह्यासह मनमाड शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोचला गेला आहे.

shubham achpale
शुभम अचपळे

मनमाड - कजाकिस्थान येथे सुरु असलेल्या एशियन चॅम्पीयन कुस्ती ( Asian Champion Wrestling ) स्पर्धेत भारताचा तिरंगा फडकला आहे. मनमाडच्या शुभम अचपळे या युवकाने ४८ किलो वजनी गटात सुवर्णपदक ( gold medal ) पटकावले आहे. या कामगिरीमुळे नाशिक जिल्ह्यासह मनमाड शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोचला गेला आहे. मनमाड येथील स्वातंत्र्यवीर सावरकर जिमखाना कुस्ती प्रशिक्षण केंद्राचा शुभम हरी अचपळे ( shubham achpale ) हा खेळाडू आहे. त्याने ४८ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकून भारताचा तिरंगा डौलाने फडकावला आहे.

यात त्याला त्याचे गुरुवर्य माजी नगराध्यक्ष साईनाथ गिडगे यांचे मार्गदर्शन लाभले. त्याशिवाय त्याला कोच महादेव मेटकर, पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते संतोष जगताप, यशवंत तुपे, अजय मोरे, महेश दारुंटे यांचे सहकार्य लाभले. मिळालेल्या विजयानंतर सावरकर जिमखाना तर्फे त्यांच्या विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. शुभम अचपळे हा चांदवड तालुक्यातील शिंगवे येथील एका शेतकरी कुटूंबातला मुलगा आहे. घरची परिस्थिती अतिशय प्रतिकुल असतांनाही त्यांचे वडील हरिभाऊ अचपळे व आई सौ. मंदाकिनी अचपळे यांनी शुभमला घरातून कुस्तीसाठी प्रोत्साहीत केले. शुभमचे गुरुवर्य साईनाथ गिडगे यांनी शुभमला व त्याच्या लहान भावाला वयाच्या ६ व्या वर्षी दत्तक घेतले. त्यानंतर शुभमने साईनाथ गिडगे यांच्या तालीमीत कुस्तीचे धडे गिरविले व आज त्याने कजाकिस्थान येथे ४८ किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावून देशाचे व आपल्या मनमाड शहराचे नाव उंचावले आहे. शुभमच्या या घवघवीत यशाबद्दल वीर सावरकर नगर शिवसेना व मित्र मंडळातर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला.तसेच मनमाड शहरातील सर्व स्तरांतून त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे.

गिडगे यांचे कुस्तीसाठी योगदान - मनमाड शहर हे कबड्डीची पंढरी म्हणून ओळखले जाते मात्र याउलट माजी नगराध्यक्ष साईनाथ गिडगे यांनी शहरात कुस्तीसाठी योगदान देत अनेक मुलांना दत्तक घेत कुस्तीत त्यांचे करियर घडवले आहेत.त्यांच्या कुस्ती प्रेमामुळेच आज भारताला कजाकीस्थानात शुभमच्या रूपाने सुवर्णपदक मिळवता आले.

हेही वाचा - रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत सर्फराज खानचे झुंजार शतक, विजयानंतर भरून आले डोळे

Last Updated : Jun 24, 2022, 2:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.