भोपाळ : मध्य प्रदेशात सुरू असलेल्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये महाराष्ट्रातील खेळाडूंनी आपला दबदबा कायम ठेवला आहे. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत आतापर्यंत सर्वाधिक पदके जिंकली आहेत. पदकतालिकेत महाराष्ट्र संघ अव्वल स्थानावर आहे. ज्यांच्या खात्यात आतापर्यंत 84 पदकांची नोंद झाली आहे. त्यात 28 सुवर्ण, 30 रौप्य आणि 26 कांस्य पदके आहेत.
हरियाणा 23 सुवर्णांसह तिसऱ्या स्थानावर : मध्य प्रदेश पदक टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. ज्यामध्ये त्याने 25 सुवर्ण, 13 रौप्य आणि 20 कांस्य अशी एकूण 58 पदके जिंकली आहेत. दुसरीकडे, हरियाणाचा संघ 23 सुवर्ण, 18 रौप्य, 15 कांस्य आणि एकूण 56 पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे. चौथ्या क्रमांकावर राजस्थानने चांगली कामगिरी करत आपले स्थान गाठले आहे. सुरुवातीच्या दिवसांत राजस्थानचा संघ गुणतालिकेत खूपच कमी होता, पण मंगळवारपर्यंत त्याने 11 सुवर्ण पदके जिंकले आणि एकूण 28 पदकांसह चौथ्या स्थानावर पोहोचण्यात यश मिळविले. दुसरीकडे, ओडिशाचा संघ 9 सुवर्णांसह पाचव्या स्थानावर आहे.
पंजाब पदतालिकेत 10व्या स्थानावर : त्याचप्रमाणे पदकतालिकेत पश्चिम बंगालचा संघ 8 सुवर्णांसह एकूण 23 पदकांसह 6व्या स्थानावर आहे. त्याचबरोबर तामिळनाडूचा संघ 7 सुवर्ण पदकांसह एकूण 24 पदकांसह सातव्या स्थानावर आहे. उत्तर प्रदेश संघ 6 सुवर्ण पदकांसह एकूण 26 पदकांसह आठव्या स्थानावर आहे. दुसरीकडे, देशाची राजधानी दिल्ली 5 सुवर्ण पदकांची कमाई करून एकूण 23 पदकांसह नवव्या स्थानावर आहे. पंजाबचा संघ गुणतालिकेत पहिल्या दहामध्ये आपले नाव नोंदवण्यात यशस्वी ठरला आहे. विविध स्पर्धांमध्ये त्याने 5 सुवर्णपदके जिंकली आहेत. तेलंगणा 3, केरळ आणि कर्नाटक प्रत्येकी दोन सुवर्णांसह पदकतालिकेत संघर्ष करत आहेत.
इंडिया युथ गेम्स : वेटलिफ्टर विनाताई आहेर हिने खेलो इंडिया युथ गेम्स 2022 मध्ये स्नॅचमध्ये 57 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 72 किलो वजन उचलून नवीन विक्रम केला होता. विनाताई मनमाड जिममध्ये प्रवीण व्यवहारे यांच्याकडून प्रशिक्षण घेत असलेल्या विनाताई या वजन गटात राष्ट्रीय युवा रेकॉर्डधारक आकांक्षा व्यवहारे यांच्यासोबत सराव करते. आकांक्षा व्यवहारे 14 वर्षांची असून ती प्रथमच मध्य प्रदेशात आयोजित खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत सहभागी होत आहे. साताऱ्यातील कराड तालुक्यामधील किरपे या खेडेगावातील प्राची अंकुश देवकर हि खेलो इंडिया स्पर्धेत सहभागी होत आहे.