ETV Bharat / sports

आगामी खेलो इंडिया गेम्समध्ये ४ नवीन खेळांचा समावेश - new games in khelo india

खेलो इंडिया युथ गेम्स -२०२१ मध्ये गटका, कलारिपयट्टू, थांगा-ता आणि मल्लखांब या खेळांचा समावेश करण्यात आला आहे. ''योगासनबरोबर खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा २०२१ मध्ये चार देशी खेळांचा समावेश करण्यात आला याबद्दल मला आनंद झाला", असे केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू म्हणाले आहेत.

Khelo India Youth Games 2021 will have four indigenous games
आगामी खेलो इंडिया गेम्समध्ये ४ नवीन खेळांचा समावेश
author img

By

Published : Dec 21, 2020, 7:27 AM IST

नवी दिल्ली - हरयाणाच्या पंचकुला येथे होणाऱ्या खेलो इंडिया युथ गेम्स-२०२१ मध्ये गटका, कलारिपयट्टू, थांगा-ता आणि मल्लखांब या चार देशी खेळांना समाविष्ट करण्यास क्रीडा मंत्रालयाने मान्यता दिली आहे.

"देशी खेळांचा भारतातील समृद्ध वारसा आहे. या खेळांचे जतन, प्रसार करणे ही क्रीडा मंत्रालयाची प्राथमिकता आहे. खेलो इंडिया गेम्स यापेक्षा आणखी कोणतेही व्यासपीठ नाही. या खेळांचे खेळाडू स्पर्धा करू शकतात. योगासनबरोबर खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा २०२१ मध्ये चार देशी खेळांचा समावेश करण्यात आला याबद्दल मला आनंद झाला", असे केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू म्हणाले आहेत.

Khelo India Youth Games 2021 will have four indigenous games
मल्लखांब

हेही वाचा - बार्सिलोनासाठी ६४३ गोल!..मेस्सीची पेलेंच्या विक्रमाशी बरोबरी

कलारिपयट्टू हा एक भारतीय मार्शल आर्टचा प्रकार आहे. केरळमध्ये जन्मलेल्या हा क्रीडा प्रकार जगभर खेळला जातो. मल्लखांबही पारंपारिक क्रीडा प्रकार असून मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात या खेळाचा नावलौकिक आहे.

कलारिपयट्टू

गटका पंजाबच्या शीखांशी संबंधित मार्शल आर्टचा एक प्रकार आहे. तर, थांगा-ता हा एक मार्शल आर्टचा प्रकार आहे. मणिपूरच्या ईशान्येकडील राज्यात थांग-ता प्रसिद्ध असून हुयेन लाँगलोन प्रकाराचा सशस्त्र लढाऊ घटक आहे.

गटका

थांग-ता

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.