ETV Bharat / sports

लवकरच भारताची जर्सी घालून 'तो' धावणार मैदानात

मुदाबिदरी येथे झालेल्या कंबाला शर्यतीत श्रीनिवास गौडाने रेड्यांना घेवून पाण्यातून १४२.५ मीटर अंतर केवळ १३.६२ सेकंदात पार केले होतो. त्यानंतर त्याला भारताचा उसेन बोल्ट म्हणून ओळखले जात आहे. याबाबत माहिती मिळताच सर्वप्रथम देशाचे क्रीडा मंत्री किरेन रिजूजू यांनी त्याला साईमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी आमंत्रित केले. श्रीनिवास गौडाला भारतीय क्रीडा प्राधिकरणा(साई)च्यावतीने बंगळुरू येथे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

author img

By

Published : Feb 26, 2020, 1:15 PM IST

Kambala jockey Srinivas Gowda
श्रीनिवास गौडा

बंगळुरू - कंबालामध्ये (चिखलगुट्टा पद्धतीच्या पारंपरिक बैलगाडी शर्यत) विक्रम नोंदवल्यानंतर चर्चेत आलेला श्रीनिवास गौडा लवकरच भारताची जर्सी घालून मैदानात धावणार आहे. श्रीनिवास गौडाला भारतीय क्रीडा प्राधिकरणा(साई)च्यावतीने बंगळुरू येथे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

मुदाबिदरी येथे झालेल्या कंबाला शर्यतीत श्रीनिवास रेड्यांना घेवून पाण्यातून १४२.५ मीटर अंतर केवळ १३.६२ सेकंदात पार केले होतो. याचा अर्थ गौडाने १०० मीटर अंतर फक्त ९.५५ सेकंदात पार केले. त्यानंतर त्याला भारताचा उसेन बोल्ट म्हणून ओळखले जात आहे. याबाबत माहिती मिळताच सर्वप्रथम देशाचे क्रीडा मंत्री किरेन रिजूजू यांनी त्याला साईमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी आमंत्रित केले होते. त्यानंतर साईच्या दक्षिण विभागाचे प्रमुख अजय कुमार बहल यांनीही त्याला बंगळुरूच्या प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण देण्याची इच्छा व्यक्त केली होती.

हेही वाचा - उसेन बोल्ट पेक्षाही वेगवान..! ९.५५ सेकंदात १०० मीटर अंतर पार, सोशल मीडियावर 'त्याची'च चर्चा

सुरुवातीला श्रीनिवास गौडाने याबाबत उत्सुकता दाखवली नाही. मात्र, चिखलात धावणे आणि मैदानावर धावण्यातील फरक लक्षात आल्यानंतर त्याने प्रशिक्षण घेण्याची तयारी दाखवली आहे. सध्या सुरू असलेल्या कंबाला स्पर्धा संपल्यानंतर एप्रिल महिन्यात गौडा साईच्या बंगळुरू केंद्रात दाखल होणार आहे.

श्रीनिवास २८ वर्षांचा असून त्याने शिक्षण सोडून दिलेले आहे. कंबाला शर्यंतींच्या मोसमात तो शर्यतींची तयारी करतो. तर इतर दिवशी बांधकाम व्यावसायिकांकडे काम करतो. पाच ते सहा वर्षांपासून त्याला कंबाला शर्यतींचा छंद लागला आहे. या शर्यतीतून बक्षिसाच्या रुपाने श्रीनिवास १ ते २ लाख रुपयांची कमाई करतो.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.