अबुधाबी - रविवारी पार पडलेल्या फॉर्म्युला थ्री आशियाई चॅम्पियनशिपच्या तिसऱ्या फेरीत भारतीय रेसर जेहान दारुवालाने सरशी साधली. या विजयासह तो गुणतालिकेत दुसर्या क्रमांकावर पोहोचला आहे. जेहान मुंबई फाल्कन्सचा रेसर आहे.
हेही वाचा - भारताचे महान माजी टेनिसपटू अख्तर अली यांचे निधन
प्रत्येक रेसरला शनिवार व रविवारी टायर्सचे दोन सेट वापरण्याची परवानगी होती आणि जेहानने या दोन दिवसाच्या अंतिम शर्यतीसाठी आपले नवीन टायर ठेवले होते. पोल पोजिशनपासून सुरुवात करणाऱ्या जेहानने सुरुवातीपासून आघाडी घेत हा विजय साकारला.
या शर्यतीत फाल्कन्सच्या कुश मैनीनेही आठवे स्थान मिळवले. यामुळे संघाला अतिरिक्त गुण मिळवण्यात मदत झाली. दुसर्या शर्यतीनंतर जेहान तिसर्या स्थानावर घसरला होता. परंतु या विजयामुळे दुसर्या स्थानावर पोहोचला आहे. आता चॅम्पियनशिपमध्ये दोन फेऱ्यांमधील सहा शर्यती बाकी आहेत.