ETV Bharat / sports

FIFA World Cup 2022: विश्वचषकात सलग दुसऱ्या दिवशी मोठा उलटफेर, जपानने चार वेळच्या विजेत्या जर्मनीला हरविले

वर्ल्डकपमध्ये दोन दिवसांत दोन आशियाई संघांनी उलटफेर केला आहे. मंगळवारी सौदी अरेबियाने अर्जेंटिनाविरुद्ध 2-1 असा विजय मिळवला होता.

Japan vs Germany
Japan vs Germany
author img

By

Published : Nov 23, 2022, 11:01 PM IST

दोहा - फिफा विश्वचषक 2022 (FIFA World Cup 2022) मध्ये आज दुसऱ्या सामन्यात जर्मनी आणि जपान आमनेसामने होते. FIFA विश्वचषक 2022 मध्ये सलग दुसऱ्या दिवशी मोठा उलटफेर पाहायला मिळाला. जपानने चार वेळच्या चॅम्पियन जर्मनीचा 2-1 असा धक्कादायक पराभव केला. वर्ल्डकपमध्ये दोन दिवसांत दोन आशियाई संघांनी उलटफेर केला आहे. मंगळवारी सौदी अरेबियाने अर्जेंटिनाविरुद्ध 2-1 असा विजय मिळवला होता.

जपानचे दोन्ही गोल बदली खेळाडूंनी केले. जपानसाठी रित्सू डोआनने 75व्या मिनिटाला आणि ताकुमा असानोने 83व्या मिनिटाला गोल केले. तत्पूर्वी, एलकाई गुंडोआनने ३३व्या मिनिटाला पेनल्टीवर जर्मनीसाठी पहिला गोल केला.

ताकुमा असानोने जपानसाठी दुसरा गोल केला. त्याने ८३व्या मिनिटाला गोल केला. अशा प्रकारे जपानने जर्मनीविरुद्ध 2-1 अशी आघाडी घेतली आहे. 57व्या मिनिटाला तो बदली खेळाडू म्हणून मैदानात आला होता.

जपानच्या रित्सू डॉनने केला पहिला गोल केला. त्याने 75व्या मिनिटाला गोल केला. तो 71व्या मिनिटाला बदली खेळाडू म्हणून मैदानात आला होता.

जर्मनीचा मिडफिल्डर गुंडोआनने पहिला गोल केला. त्याने 33व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल केला. जर्मनीने जपानविरुद्ध १-० अशी आघाडी मिळवली होती.

2014 चा वर्ल्डकप विजेता जर्मनी 2018 मध्ये ग्रुप स्टेज मधूनच बाहेर पडला होता. यावेळी जर्मनीचा संघ मोठ्या तयारीने कतारला आला होता. मात्र पहिल्याच सामन्यात पराभव झाल्याने जर्मनीच्या विश्वचषकातील पुढचा प्रवास अत्यंत खडतर असणार आहे.

दोन्ही संघांची स्टार्टींग इलेव्हन -

जपान - शुची गोंडा (गोलकीपर), हिरोकी साकाई, को इटाकुरा, माया योशिदा, जुन्या इतो, युटो नागातोमो, वाटारू एंडो, एओ तनाका, टेकफुसा कुबो, दाइची कामदा, डेझेन माइदा.

जर्मनी - मॅन्युएल न्यूअर (गोलकीपर), डेव्हिड रौम, अँटोनियो रुड्रिगर, निकोलस सुएल, निको श्लोटरबेक, जोशुआ किमिच, एल्के गुडगेन, जमाल मुसियाला, थॉमस म्युलर, सर्ज ग्नॅब्री, काई हॅव्हर्ट्ज.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.