ETV Bharat / sports

FIFA World Cup 2022: इराणचा वेल्स वर 2-0 ने थरारक विजय - इराणने वेल्सचा पराभव

दिवसाचा पहिला सामना इराण आणि वेल्स (Iran Vs Wales) यांच्यात झाला. इराणने वेल्सचा 2-0 असा पराभव केला आहे. (FIFA World Cup 2022)

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Nov 25, 2022, 10:37 PM IST

दोहा : फिफा विश्वचषक 2022 (FIFA World Cup 2022) चे आज तीन सामने खेळले जाणार आहेत. दिवसाच्या पहिल्या सामन्यात इराणने वेल्सचा 2-0 असा पराभव केला. (Iran Vs Wales) कतार विश्वचषकाच्या सहाव्या दिवशी इराणने वेल्सचा पराभव करून पहिला विजय मिळवला. इराणने ‘ब’ गटातील वेल्सविरुद्ध निर्धारित वेळेनंतरच्या इंज्युरी टाइममध्ये दोन गोल करत हा सामना जिंकला. या विजयासह इराणचे तीन गुण झाले आहेत. ब गटात इराणला मागील सामन्यात इंग्लंडकडून ६-२ असा पराभव स्वीकारावा लागला होता. तर, यूएसए आणि वेल्स यांच्यातील मागील सामना 1-1 असा बरोबरीत संपला होता.

राझियानने दुसरा गोल केला : पहिला गोल केल्यानंतर इराणचा संघ थांबला नाही. त्यांनी आणखी एक गोल केला. रामीन रझियानने एक्स्ट्रा टाईममध्ये गोल केला (90+11).

चेश्मीने केला इराणसाठी पहिला गोल : रुबेज चेश्मीने इराणचा पहिला गोल केला. त्याने एक्स्ट्रा टाईममध्ये (९०+८) गोल केला. हा गोल देखील खास आहे, कारण या विश्वचषकातील पेनल्टी क्षेत्राबाहेर केलेला हा पहिला गोल आहे.

वेल्सच्या गोलरक्षकाला विश्वचषकाचे पहिले रेड कार्ड : वेल्सचा गोलरक्षक वेन हेनेसी याला ८६व्या मिनिटाला लाल कार्ड दाखवण्यात आले. इराणचा स्ट्रायकर तारेमीला बॉक्सच्या बाहेर रोखण्यासाठी त्याने त्याला धोकादायकपणे टॅकल केले. हेनेसीच्या जागा राखीव गोलरक्षक डेनी वॉर्डने घेतली.

सामन्याच्या हाफ टाइमपर्यंत एकही गोल नाही : इराण आणि वेल्स संघांना सामन्याच्या हाफ टाइमपर्यंत एकही गोल करता आला नाही. वेल्सचा कर्णधार गॅरेथ बेललाही आतापर्यंत विशेष काही करता आलेले नाही. पहिल्या हाफमध्ये वेल्सचा चेंडूवर अधिक प्रमाणात ताबा (64%) होता. वेल्सने 4 वेळा गोलसाठी प्रयत्न केले, मात्र गोल होऊ शकला नाही. त्यातील दोन फटके निशाण्यावर असले तरी इराणच्या गोलरक्षकाने चांगला बचाव केला.

ऑफसाइड नियमानुसार इराणचा गोल नाकारण्यात आला : इराणच्या गोलिझादेहने १६व्या मिनिटाला चेंडू गोलपोस्टमध्ये टाकला. व्हिडिओ असिस्टेड रेफरल (VAR) मात्र ते नाकारले. अजमूने गोलिजादेहकडे चेंडू पास केला तेव्हा गोलिजादेह विरोधी संघाच्या बचावपटूच्या पुढे होता, म्हणजेच येथे ऑफसाइड नियम लागू झाला होता.

स्टार्टिंग 11 :

वेल्स: वेन हेनेसी (गोलकीपर), नेको विल्यम्स, बेन डेव्हिस, ख्रिस मेफॅम, जो रोडेन, हॅरी विल्सन, अॅरॉन रॅमसे, गॅरेथ बेल (कर्णधार), किफर मूर, कॉनर रॉबर्ट्स, एथन अम्पाडू.

इराण: होसेन होसेनी (गोलकीपर), एहसान हाजी साफी, मिलाद मोहम्मदी, सईद एजातोलाही, मुर्तझा पोरलिगंजी, मेहदी तारेमी, अली घोलीजादेह, माजिद हुसैनी, सरदार अजमोन, अहमद नूररोलाही, रमीन रेझायन.

आजच्याच दिवशी, दोन वर्षांपूर्वी, 'हँड ऑफ गॉड' गोलसाठी प्रसिद्ध असलेल्या डिएगो मॅराडोनाने जगाचा निरोप घेतला होता. अर्जेंटिनाला विश्वचषक जिंकून देणाऱ्या महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांचे 25 नोव्हेंबर 2020 रोजी निधन झाले. ते 60 वर्षांचे होते. मॅराडोनाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

  • Remembering the great Diego Maradona, who sadly passed away two years ago today.

    You are always in our thoughts, Diego 💙🇦🇷 pic.twitter.com/ZI5LCYhaKD

    — FIFA.com (@FIFAcom) November 25, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.