ETV Bharat / sports

INTERVIEW: कास्य पदकावर समाधानी नाही लवलिना बोर्गोहेन, म्हणाली पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकून स्वप्न पूर्ण करेन - टोकियो ऑलिम्पिक 2020

ईटीव्ही भारतने लवलिना बोर्गोहेन हिच्याशी खास बातचित केली. यात तिने दिलखुलास उत्तर दिली. वाचा काय म्हणाली लवलिना...

INTERVIEW: 'Happy with Bronze', Lovlina aims 'dream' Gold medal at Paris Olympics
INTERVIEW: कास्य पदकावर समाधानी नाही लवलिना बोर्गोहेन, म्हणाली पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकून स्वप्न पूर्ण करेन
author img

By

Published : Aug 12, 2021, 3:35 PM IST

मुंबई - भारतीय महिला बॉक्सर लवलिना बोर्गोहेन हिला टोकियो ऑलिम्पिकमध्ये कास्य पदकावर समाधान मानावे लागले. 23 वर्षीय लवलिनाने महिला 69 किलो वजनी गटात ही कामगिरी केली. या स्पर्धेत तिचा उपांप्तपूर्व फेरीत सामना माजी जगज्जेती तैवानच्या चिन चेन हिच्याशी झाला होता. लवलिनाने या सामन्यात चीन चेनचा 4-1 ने पराभव करत उपांत्य फेरी गाठली होती. पण तिचा उपांत्य फेरीत पराभव झाला. यामुळे तिचे सुवर्ण पदकाचे स्वप्न भंगले. ईटीव्ही भारतने लवलिनाशी खास बातचित केली. यात तिने आपण कास्य पदकावर समाधानी नसल्याचे सांगत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकत स्वप्न पूर्ण करणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. लवलिनाने ईटीव्ही भारतच्या प्रश्नांवर दिलखुलास उत्तर दिली. वाचा काय म्हणाली लवलिना...

प्रश्न - देशासाठी पदक जिंकल्यानंतर कसे वाटत आहे?

उत्तर - मला खूप चांगलं वाटत आहे. मी पदक जिंकून भारतात परतले. पण मी जर सुवर्ण पदक जिंकले असते तर याहून अधिक आनंद झाला असता.

प्रश्न - तु जे मिळवलं आहेस, त्यावर तु यावर समाधानी आहेस का?

उत्तर - मी खूप चिंतेत होते. कारण मी कधी कोणत्या सामन्यात पराभूत होण्याचा विचार केला नव्हता. मी भारतासाठी सुवर्ण पदक जिंकण्याच्या इराद्याने टोकियोला गेले होते. मी सामन्यात फक्त सुवर्ण पदकाचा विचार करत होते आणि याच विचाराने मला पुढे नेलं. कास्य पदक जिंकल्यानंतर मी स्वत:ला दिलासा दिला की, ही फक्त सुरूवात आहे. लक्ष्य हे सुवर्ण पदक जिंकणं आहे. उपांत्य फेरीत पराभव झाल्यानंतर मला खुप दु:ख झाला. मी या विचाराने चिंताग्रस्त होते की, मला भारताला सुवर्ण पदक जिंकून देता आलं नाही.

प्रश्न - मायदेशी परतल्यानंतर तुझे भव्य स्वागत करण्यात आले, याविषयी काय सांगशील?

उत्तर - मायदेशी परतल्यानंतर लोकांनी ज्या जल्लोषात स्वागत केलं, प्रेम दिलं. हे माझ्यासाठी अविश्वसनीय होतं. देशासाठी पदक जिंकणे आनंददायी ठरते. माध्यमे आणि राजकीय नेत्यांसह प्रत्येकांनं आमचं स्वागत केलं. आपण खासकरून कोणत्याही खेळाडूने पदक जिंकलं की जल्लोष साजरा करण्यास सुरूवात करतो.

प्रश्न - तुला वाटतं की सुरूवातीपासून यावर लक्ष्य दिलं पाहिजे. जेव्हा तु बॉक्सिंगचा सराव करत होतीस. त्यावेळी हे तुझ्यासाठी किती कठीण ठरलं?

उत्तर - होय, सुरूवात कठीण राहिली. हे खरं आहे की, लोक तुम्ही पदक जिंकल्यानंतर तुम्हाला नोटीस करतात. मला वाटत की, खेळाडू जेव्हा सराव करत आहे. तेव्हा त्याला अशा लोकांकडे लक्ष्य देण्याची गरज नाही. जेव्हा तुम्हाला कोणी जवळ येऊन म्हणालं की, तु खूप चांगलं करत आहेस तर त्याच्या तयारीत अडथळा येऊ शकतं. ही बाब चांगली आहे की, हे सर्व पदक जिंकल्यानंतर होतं. आम्ही आमचं 100 टक्के दिलं. त्यानंतर आम्ही याचा आनंद घेण्यास पात्र आहे. लोकं फक्त निकाल पाहून आनंदीत होतील.

प्रश्न - जेव्हा तु सुरूवात केली होतीस तेव्हा तुला आलेल्या अडचणीविषयी काय सांगशील?

जेव्हा मी सुरूवात केली होती. तेव्हा मला परवानगी मिळवण्यासाठी खूप अडचणी आल्या. पण मी जसजशे नॅशनल आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पुढे गेले. तेव्हा मला पाठिंबा मिळू लागला. सरकार, साई आणि बीएफआय यांच्यामुळे प्रत्येक खेळाडू चांगलं प्रदर्शन करू शकत आहे. पण यात तुम्हाला नक्कीच स्व:तला सिद्ध करावं लागतं. तुम्हाला त्यांचा विश्वास जिंकावा लागेल.

तुम्हाला स्वत:वर विश्वास असला पाहिजे आणि तुम्हाला स्वत:ला सिद्ध करावं लागेल की तुम्ही बेस्ट आहात. तेव्हाच लोकं तुमच्यावर विश्वास ठेवतील. याआधी मी मार्शल आर्ट खेळलं आहे त्यानंतर मी बॉक्सिंगकडे वळाली. जेव्हा मी बॉक्सिंगकडे वळाले तेव्हा मला अडचणींचा सामना करावा लागला नाही. कारण साई माझ्यापाठिमागे उभी होती. यात त्यांनी मला लागणाऱ्या सर्व साहित्यांचा पुरवठा केला.

हेही वाचा - Eng vs Ind: पंतला आपला नैसर्गिक खेळ करण्याची मोकळीक - विराट कोहली

हेही वाचा - मास्टर ब्लास्टरशी भेटली मीराबाई चानू, ऑलिम्पिक पदक पाहून सचिन तेंडुलकरचे रिअॅक्शन, पाहा फोटो

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.