डुंगरपुर (राजस्थान)- आंतरराष्ट्रीय तिरंदाज, प्रशिक्षक आणि डुंगरपूर जिल्ह्याचे क्रीडा अधिकारी जयंतीलाल ननोमा यांचे रविवारी अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनावर क्रीडा जगतातील मान्यवर आणि खेळाडूंनी शोक व्यक्त केला आहे.
ईटीव्ही भारतला मिळालेल्या माहितीनुसार, जयंतीलाल ननोमा हे त्यांचे मित्र कांतिलाल यांच्यासह स्कार्पियो गाडीने बांसवाडा येथे तांदूळ घेण्यासाठी गेले होते. ते तांदूळ घेऊन परतत असताना त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडीचा अपघात झाला. या अपघातात जयंतीलाल यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. हा अपघात सागवाडा रोडवरील वरदा पोलीस स्टेशनच्या परिसरात झाला.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जयंतीलाल आणि कांतिलाल यांना सागवाडा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान जयंतीलाल यांचे निधन झाले. जयंतीलाल यांच्या निधनाने डुंगरपूर जिल्ह्यातील क्रीडा विश्वात शोककळा पसरली आहे. दरम्यान, जयंतीलाल यांचे पार्थिव शवविच्छेदन करून त्यांच्या नातेवाईकांकडे सोपवण्यात येणार आहे. यानंतर त्यांच्या पार्थिवावर बिलडी गावात अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.
हेही वाचा - क्रिकेटपटू मोहम्मद शमीच्या पत्नीने शेअर केला न्यूड फोटो
हेही वाचा - विनेशची 'खेलरत्न'साठी सलग दुसऱ्या वर्षी शिफारस, महाराष्ट्राचा राहुल अवारे 'अर्जुन'साठी...