नागपूर - आजच्या घडीला देशपातळीवर खेळाडू घडावे यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. यात काही सरकारी पातळीवर होत आहेत. तसेच खाजगी स्तरावर काही ध्येयवेडे प्रशिक्षक मेहनत घेत आहेत. पण प्रत्येक ठिकाणी शासन पोहचू शकेल असे नाही. स्वतः परिश्रम घेत खेळाडू घडवणारे प्रशिक्षक सुद्धा आहेत. अशातच दादाजी कोंडदेव पुरस्कार प्राप्त संजय उर्फ भाऊ काणे यांच्याकडून खेळ आणि आजच्या घडीला दिले जाणारे प्रशिक्षण आणि मिळणाऱ्या सोयी सुविधांवर केलेली खास बातचीत..
खरतर कुठंलाही खेळ असो हा आनंदासाठी खेळायला पाहिजे....
खेळात आनंद मिळत गेला की हळूहळू प्रगती होतेच. जिल्हा राज्य आणि मग आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळात नावलौकिक मिळवता येतो. नागपुरात 16 वर्षाची आलिया शेख ही इंटरनॅशनल खेळली आहे. त्यामागे तिची ताकद ठरली तिच्या वडिलांची जिद्द आणि खेळात नाव करण्यासाठीची तपश्चर्या फार म्हत्वाची. INDIA लिहिलेले ब्लेजर मिळवण्यासाठी खेळाडू कठीण परिश्रम करत असल्याचेही ते सांगतात.
खेळाला राजाश्रयाचीही गरज...
केंद्रीय मंत्र्यांनी 36 वेगवेगळ्या स्पर्धा घेऊन खेळाडूंना व्यासपीठ दिले. हळूहळू वातावरण पुन्हा निर्माण होईल आणि प्रशिक्षक पुढे येतील. पालकांच्याही दृष्टोकोनात बदलत होईल. पश्चिम महाराष्ट्रात याकडे लक्ष असते पण आपल्याकडे इथे फारसे होताना दिसत नसल्याची खंत आहे.
संशोधनाची गरज....
खेळात संशोधन होण्याची गरज आहे. यात कधी ग्राउंडवर धावलो नसलो तरी पहिली खेळाडू ही इंटरनॅशनल खेळली केवळ व्हिजनमुळे, असे भाऊ काणे सांगतात. ज्या प्रशिक्षकामुळे मार्क स्पिटझ आठ आठ गोल्ड मेडल मिळवतो तो प्रशिक्षक कधी पाण्यात उतरला नाही. पण त्याकडे असलेल्या व्हिजनमुळे हे शक्य झाले.
खेळात प्रशिक्षकाने खेळाडूला अपयश पचवणेही शिकवले पाहिजे....
फोगट कुटुंबातील मुलीने आत्महत्या केली असे घडू नये. हार जीत ही होत राहील. जिंकण्याची पहिली पायरीत अपयश हे येत राहते. यामुळे त्यातून शिकणेही तेवढेच महत्वाचे आहे. हे दुःखद आहे की त्यांना आज घडवण्यात कमी पडतो प्रशिक्षक म्हणून आम्ही कुठे कमी पडलो की तिला हे समजावू शकलो नाही.
शासकीय स्तरावर काय चाललंय...
नागपुरात आजच्या घडीला अनेक खेळात मुले खेळत आहेत. पूर्वी नागपूरची ओळख या दोन खेळात ही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर होती. पण आज काळाच्या ओघात सर्व काही मागे पडले आहे. 1990 ते 2000 च्या दशकात अनेक खेळाडू राष्ट्रीय स्थरावर घडले आहे. शासकीय स्तरावर क्रीडा प्रबोधनी काम करत आहे. पण मागील वर्षभरात कोरोनामुळे बंदी असल्याने खेळ बंद स्पर्धा नाही परिणामी हाती काही लागले नाही. यात मागील वर्षात हॅन्डबॉल क्रीडा प्रबोधनीतून दोघांची नॅशनल स्पर्धेसाठी निवड झाली. अथलेटिकमध्ये एकाला रौप्य पदक मिळाले आहे. इतर काही खेळात परिस्थिती अशीच आहे. पण ऑलम्पिक मध्ये सहभाग घेण्यासाठी प्रशिक्षक आणि चांगल्या सोयी सुविधा मिळाल्या तरच उद्याचे भविष्य हे खेळाडूच्या माध्यमातून घडू शकेल यात शंका नाही.