मुंबई - भारताची भावना जाट हिने २० किलोमीटर चालण्याच्या स्पर्धेत ऑलिम्पिक तिकिट मिळवले. तिने शनिवारी नॅशनल चॅम्पियनशीप स्पर्धेत २० किलोमीटरचे अंतर १ तास ३८ मिनिटे ३० सेंकदात पूर्ण केले. दरम्यान या स्पर्धेची वेळ १ तास ३१ मिनिटे होती. पण भावनाने कमी वेळेत ही स्पर्धा जिंकली. तसेच तिने आपलाच विक्रम मोडित काढत नव्या विक्रमाची नोंद केली.
प्रियंका गोस्वामीचे ऑलिम्पिक तिकिट अवघ्या ३६ सेकंदानी हुकलं. दुसरे क्रमांकावर राहिलेल्या प्रियंकाने हे अंतर १ तास ३१ मिनिट ३६ सेकंदात पूर्ण केले.
पुरुष वर्गात संदीपचे ऑलिम्पिक तिकिट ३४ सेकंदानी हुकलं. त्याने ही स्पर्धा १ तास २१ मिनिट ३४ सेकंदात पूर्ण केली. जर संदीपची पुढील महिन्यात होणाऱ्या आशियाई स्पर्धेत निवड झाल्यास, त्याला त्या स्पर्धेच्या रुपाने ऑलिम्पिकचे तिकिट पक्के करण्याची आणखी एक संधी मिळेल.
दरम्यान २० किलोमीटर चालण्याच्या स्पर्धेत केटी इरफानने भारताला पहिले ऑलिम्पिक तिकिट मिळवून दिले होते. त्याने मागील वर्षी मार्चमध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत ही कामगिरी केली होती.
हेही वाचा -
उसेन बोल्ट पेक्षाही वेगवान..! ९.५५ सेकंदात १०० मीटर अंतर पार, सोशल मीडियावर 'त्या'ची चर्चा
हेही वाचा -
शाहिद आफ्रिदीला पाचवी मुलगी; सोशल मीडिया युझर्स म्हणाले, बस्स कर यार...