ETV Bharat / sports

बास्केटबॉल : दुसऱ्या सामन्यातही इंडियाना पेसर्सची सॅक्रेमेंटो किंग्सवर मात - indiana pacer latest news

भारतात पहिल्यांदा सुरू असलेल्या एनबीए प्री-सीजनच्या दुसऱ्या सामन्यालाही  प्रेक्षकांनी खूप गर्दी केली होती. पेसर्सच्या संघाकडून एलिजे जॉन्सनने तर, किंग्सकडून बडी हील्डने सर्वाधिक १७ गुण मिळवले. जॉन्सनव्यतिरिक्त एंथोनी हॉलिडेने १६ आणि जकार सैमशनने १५ गुण मिळवत पेसर्सच्या विजयात योगदान दिले.

बास्केटबॉल : दुसऱ्या सामन्यातही इंडियाना पेसर्सची सॅक्रेमेंटो किंग्सवर मात
author img

By

Published : Oct 6, 2019, 8:18 AM IST

मुंबई - मुंबईत रंगलेल्या एनबीएच्या रोमांचक प्री-सीजनच्या दुसऱ्या सामन्यातही इंडियाना पेसर्सने आपले वर्चस्व राखले. शनिवारी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात पेसर्सने सॅक्रेमेंटो किंग्सला १३०-१०६ अशा फरकाने हरवले.

हेही वाचा - हिटमॅनला बाद करणाऱ्या 'त्या' गोलंदाजाने कसोटीत गाठले त्रिशतक!

भारतात पहिल्यांदा सुरू असलेल्या एनबीए प्री-सीजनच्या दुसऱ्या सामन्यालाही प्रेक्षकांनी खूप गर्दी केली होती. पेसर्सच्या संघाकडून एलिजे जॉन्सनने तर, किंग्सकडून बडी हील्डने सर्वाधिक १७ गुण मिळवले. जॉन्सनव्यतिरिक्त एंथोनी हॉलिडेने १६ आणि जकार सैमशनने १५ गुण मिळवत पेसर्सच्या विजयात योगदान दिले.

सामन्याचे पहिले सत्र संपेपर्यंत, बोग्डन बोग्डानोविकच्या पाच गुणांच्या बळावर किंग्सच्या संघाने ३०-२५ अशी आघाडी घेतली होती. दुसऱ्या सत्रात मात्र पेसर्सने दमदार पुनरागमन करत ४६-३७ अशी आघाडी घेतली. या सत्रानंतर, पेसर्सने मागे वळून बघितले नाही. शेवटच्या सत्रात किंग्सने झुंज देण्याचा प्रयत्न केला खरा पण त्यांना यश आले नाही.

एनबीएच्या प्री-सीजनच्या पहिल्या सामन्यातही इंडियाना पेसर्सने विजय मिळवला होता. त्यांनी पहिल्या सामन्यात किंग्सवर १३२-१३१ अशी मात केली होती.

Intro:Body:

बास्केटबॉल : दुसऱ्या सामन्यातही इंडियाना पेसर्सची सॅक्रेमेंटो किंग्सवर मात

मुंबई - मुंबईत रंगलेल्या एनबीएच्या रोमांचक प्री-सीजनच्या दुसऱ्या  सामन्यातही इंडियाना पेसर्सने आपले वर्चस्व राखले. शनिवारी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात पेसर्सने सॅक्रेमेंटो किंग्सला १३०-१०६ अशा फरकाने हरवले.

हेही वाचा -

भारतात पहिल्यांदा सुरु असलेल्या एनबीए प्री-सीजनच्या दुसऱ्या सामन्यालाही  प्रेक्षकांनी प्रेक्षकांनी खुप गर्दी केली होती. पेसर्सच्या संघाकडून  एलिजे जॉन्सनने तर, किंग्सकडून बडी हील्डने सर्वाधिक १७ गुण मिळवले. जॉन्सनव्यतिरिक्त एंथोनी हॉलिडेने १६ आणि जकार सैमशनने १५ गुण मिळवत पेसर्सच्या विजयात योगदान दिले.

सामन्याचे पहिले सत्र संपेपर्यंत, बोग्डन बोग्डानोविकच्या पाच गुणांच्या बळावर किंग्सच्या संघाने ३०-२५ अशी आघाडी घेतली होती. दुसऱ्या सत्रात मात्र पेसर्सने दमदार पुनरागमन करत ४६-३७ अशी आघाडी घेतली. या सत्रानंतर, पेसर्सने मागे वळून बघितले नाही. शेवटच्या सत्रात किंग्सने झुंज देण्याचा प्रयत्न केला खरा पण त्यांना यश आले नाही.

एनबीएच्या प्री-सीजनच्या पहिल्या सामन्यातही इंडियाना पेसर्सने विजय मिळवला होता. त्यांनी पहिल्या सामन्यात किंग्सवर १३२-१३१ अशी मात केली होती.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.