ETV Bharat / sports

Asian Championship : आशियाई चॅम्पियनशिपमध्ये भारतीय नाविकांनी जिंकली 9 पदके - आशियाई नौकायन चॅम्पियनशिप

पुरुषांच्या 49ER प्रकारात भारताने सुवर्ण आणि कांस्यपदक जिंकले. गेल्या वर्षी टोकियो 2020 ऑलिम्पिक स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करणारे देशातील अव्वल नाविक, केसी गणपती आणि वरुण ठक्कर यांनी सुवर्णपदक जिंकले. त्याचबरोबर प्रिन्स नोबल आणि मनू फ्रान्सिस यांनी कांस्यपदक जिंकले आणि सिंगापूरच्या जोडीने रौप्यपदक जिंकले.

Indian sailors
Indian sailors
author img

By

Published : Mar 6, 2022, 9:23 AM IST

अबुधाबी : भारतीय नाविकांनी शनिवारी आशियाई नौकायन चॅम्पियनशिप 2022 ( Asian Sailing Championships 2022 ) मध्ये शानदार विजय मिळवला आहे. त्याचबरोबर भारतीयांनी एकूण नऊ पदके जिंकून आपल्या मोहिमेचा शेवट केला आहे. ज्यामध्ये तीन सुवर्ण, तीन रौप्य आणि तीन कांस्यपदकांचा समावेश आहे.

पुरुषांच्या 49ER प्रकारात भारताने सुवर्ण आणि कांस्यपदक जिंकले. गेल्या वर्षी टोकियो 2020 ऑलिम्पिक स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करणारे देशातील अव्वल नाविक, केसी गणपती आणि वरुण ठक्कर यांनी सुवर्णपदक जिंकले , तर प्रिन्स नोबल आणि मनू फ्रान्सिस यांनी कांस्यपदक जिंकले आणि सिंगापूरच्या जोडीने रौप्यपदक जिंकले.

आणखी एक ऑलिम्पियन विष्णू सरवणन याने पुरुषांच्या लेझर मानक प्रकारात सुवर्णपदक जिंकले, तर महिलांच्या लेझर रेडियलमध्ये, ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी पहिली भारतीय महिला नाविक नेत्रा कुमननने रौप्य पदक जिंकले ( Netra Kumanan won the silver medal ). याबाबत भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (SAI) शनिवारी ट्विट करून ही माहिती दिली.

रितिका डांगीने मुलींच्या लेझर (ISL4) गटात भारताला तिसरे सुवर्णपदक जिंकून दिले, तर त्याच गटातील मुलांच्या विभागात सबवत विजय कुमार आणि बल्ले किरण कुमार यांनी रौप्य आणि कांस्यपदक पटकावले.

महिलांच्या आरएसएक्स प्रकारात, भारताच्या ऐश्वर्या गणेशने रौप्यपदक जिंकले, तर पुरुषांच्या आरएसएक्स प्रकारात डेने कोएल्होला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. त्यामुळे भारतीय नाविकांचा यशस्वी प्रवास पूर्ण झाला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.