गोंडोमार - पोर्तुगाल येथे खेळल्या गेलेल्या प्ले-ऑफ सामन्यात भारतीय पुरुषांच्या टेबल टेनिस संघाला झेक प्रजासत्ताककडून १-३ ने पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे भारतीय संघाने टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट गमावले आहे.
हेही वाचा - दिग्गज बास्केटबॉलपटू कोबी ब्रायंटचा १३ वर्षीय मुलीसह हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू
पुरुष दुहेरीच्या पहिल्या सामन्यात सरथ कमल आणि हरमीत देसाई यांना टॉमस पोलान्स्की आणि लुबोमीर जेनेरिचकडून १-३ (१४-१२, ५-११, ९-११, ९-११) असा पराभव पत्करावा लागला. यानंतर जी. साथियानने आपले दोन्ही एकेरी सामने (०-३ आणि २-३) गमावले. सरथ कमलने जेनकेरिक विरुद्धचा सामना ३-१ (६-११, ११-७, ११-८, ११-८) जिंकला आहे.
तत्पूर्वी, भारतीय महिला संघाला प्ले ऑफच्या सामन्यात फ्रान्सकडून २-३ असा पराभव स्वीकारला लागला होता.