चेन्नई : भारताचा युवा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद ( Indian young Grandmaster R. Pragnananda ) याने ऑनलाइन जलद बुद्धिबळ स्पर्धेच्या एअरथिंग्स मास्टर्सच्या आठव्या फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेल्या मॅग्नस कार्लसनला पराभूत करून मोठा धक्का ( Magnus Carlson defeated by Pragnananda ) दिला. सोमवारी सकाळी खेळल्या गेलेल्या सामन्यात प्रज्ञानंधाने कार्लसनचा 39 चालींमध्ये पराभव केला. त्याने अशा प्रकारे कार्लसनची विजयी मोहीम संपुष्टात आणली, ज्याने यापूर्वी सलग तीन सामने जिंकले होते.
भारतीय ग्रँडमास्टरच्या या विजयाने आठ गुण झाले आहेत. तसेच तो आठव्या फेरीनंतर संयुक्त 12व्या स्थानावर आहेत. मागील फेऱ्यांमध्ये अपेक्षेप्रमाणे कामगिरी न करणाऱ्या कार्लसनवर प्रज्ञानंदचा विजय अनपेक्षित ( Pragnananda victory over Carlson is unexpected ) होता. याआधी त्याने फक्त लेव्ह अरोनियनविरुद्ध विजय मिळवला होता. याशिवाय प्रज्ञानंदने दोन गेम अनिर्णित खेळले, तर चार गेममध्ये त्याला पराभवाचा सामना करावा लागला होता.
-
Bravo Praggnanandhaa!! 👏👏👏
— Chess.com - India (@chesscom_in) February 21, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Indian GM @rpragchess scored a stunning victory over World Champion Magnus Carlsen at the Airthings Masters yesterday! ✅✅✅#AirthingsMasters #ChessChamps #MagnusCarlsen #Praggnanandhaa pic.twitter.com/4wujOsDDLM
">Bravo Praggnanandhaa!! 👏👏👏
— Chess.com - India (@chesscom_in) February 21, 2022
Indian GM @rpragchess scored a stunning victory over World Champion Magnus Carlsen at the Airthings Masters yesterday! ✅✅✅#AirthingsMasters #ChessChamps #MagnusCarlsen #Praggnanandhaa pic.twitter.com/4wujOsDDLMBravo Praggnanandhaa!! 👏👏👏
— Chess.com - India (@chesscom_in) February 21, 2022
Indian GM @rpragchess scored a stunning victory over World Champion Magnus Carlsen at the Airthings Masters yesterday! ✅✅✅#AirthingsMasters #ChessChamps #MagnusCarlsen #Praggnanandhaa pic.twitter.com/4wujOsDDLM
त्याने अनिश गिरी आणि क्वांग लिम यांच्याविरुद्ध सामने अनिर्णित ठेवले होते. एरिक हॅन्सन, डिंग लिरेन, जॅन क्रिझिस्टोफ डुडा आणि शाखरियार मामेदयारोव्ह यांच्याकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते. काही महिन्यांपूर्वी नॉर्वेच्या कार्लसनकडून वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या सामन्यात पराभूत झालेला रशियाचा इयान नेपोम्नियाची 19 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. त्यांच्यानंतर डिंग लिरेन आणि हॅन्सन (दोघांचे 15 गुण) आहेत.
एअरथिंग्स मास्टर्समध्ये 16 खेळाडू सहभागी (16 players participate in Aarthings Masters ) होत आहेत. यामध्ये, खेळाडूला विजयासाठी तीन गुण आणि ड्रॉसाठी एक गुण मिळतो. प्राथमिक टप्प्यात आता सात फेऱ्यांची डाव अजून खेळले जायचे आहेत.