ETV Bharat / sports

जगज्जेती कोनेरु हम्पी भारतात परतली - महिला जागतिक रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा

हम्पी आज दुपारी विजयवाडा विमानतळावर पोहचली. तेव्हा चाहत्यांनी तिचे जंगी स्वागत केले. दरम्यान, हम्पीने मुलाला जन्म दिल्यानंतर तब्बल दोन वर्षांनंतर पुनरागमन केले होते.

indian grandmaster koneru humpy reached vijayawada
जगज्जेती कोनेरु हम्पी भारतात परतली
author img

By

Published : Jan 1, 2020, 8:11 PM IST

नवी दिल्ली - रशियातील मॉस्को येथे झालेल्या महिला जागतिक रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा जिंकून कोनेरू हम्पी भारतात परतली आहे. हम्पीने चीनच्या लेई टिंगजीचा टाय ब्रेकरमध्ये पराभव करत विजेतेपदावर बाजी मारली होती.

हम्पी आज दुपारी विजयवाडा विमानतळावर पोहचली. तेव्हा चाहत्यांनी तिचे जंगी स्वागत केले. दरम्यान, हम्पीने मुलाला जन्म दिल्यानंतर तब्बल दोन वर्षांनंतर पुनरागमन केले होते.

  • Andhra Pradesh: Koneru Humpy welcomed at Vijayawada Airport, on her return from Russia where she won Women's World Rapid Champion title. pic.twitter.com/Oi7hEgxGxO

    — ANI (@ANI) January 1, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

३२ वर्षीय कोनेरुचा पहिला फेरीमध्ये पराभव झाल्यानंतर, दुसऱ्या फेरीत मुसंडी मारत तिने पुनरागमन केले. त्यानंतर झालेल्या १२ व्या फेरीपर्यंत हम्पीने नऊ गुण मिळवत ती टिंगजीसह बरोबरीत राहिली. हम्पी आणि टिंगजीचे गुण समान झाल्यामुळे विजेतेपदाचा निर्णय आर्मेगेडोन गेम पद्धतीने करण्यात आला. अखेरच्या निर्णायक गेमसह हम्पीने विजेतेपद पटकावले.

हम्पी भारताकडून विश्वनाथन आनंदनंतर ही स्पर्धा जिंकणारी दुसरी खेळाडू ठरली. आनंदने २००७ मध्ये ही स्पर्धा जिंकली होती.

हेही वाचा - मै तेरा तू मेरी, जाने हिंदुस्तान...! हार्दिकने भरसमुद्रात उरकला साखरपूडा

हेही वाचा - 'विराटसारखा परफेक्ट कर्णधार, मी जीवनात नाही पाहिला'

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.