ETV Bharat / sports

Indian Female Cyclist : महिला सायकलपट्टूचे प्रशिक्षकावर गंभीर आरोप; साईने भारतीय संघाला परत बोलावण्याचा घेतला निर्णय - महिला सायकलपट्टूचे पत्र

एका महिला सायकलपटूने ( Indian Female Cyclist ) मुख्य प्रशिक्षक आरके शर्मा यांच्यावर अनुचित वर्तनाचा आरोप केल्यानंतर स्लोव्हेनियाला प्रशिक्षण आणि स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी गेलेल्या संपूर्ण भारतीय संघाला भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (SAI) परत बोलावण्याचा निर्णय घेतला आहे.

Cyclist
Cyclist
author img

By

Published : Jun 8, 2022, 5:53 PM IST

Updated : Jun 8, 2022, 10:45 PM IST

नवी दिल्ली: एका महिला सायकलपट्टूने मुख्य प्रशिक्षक आरके शर्मा यांच्यावर अनुचित वर्तनाचा आरोप ( Head coach RK Sharma accused ) केल्यानंतर स्लोव्हेनियाला प्रशिक्षण आणि स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी गेलेल्या संपूर्ण भारतीय संघाला परत बोलावण्याचा निर्णय भारतीय क्रीडा प्राधिकरणाने घेतला आहे. दरम्यान, महिला सायकलपट्टूचे पत्रही ( Letter from a female cyclist ) समोर आले असून, त्यात तिने प्रशिक्षकावर गंभीर आरोप केले आहेत.

महिला सायकलपटूने लिहिलेल्या पत्रात प्रशिक्षक आरके शर्मा यांच्यावर गंभीर आरोप करण्यात ( Serious allegations against the coach ) आले आहेत. सर्व तयारी पूर्ण झाल्यावर 15 मे ते 14जून या कालावधीत स्लोव्हेनियामध्ये सायकलिंग प्रशिक्षण शिबिरासाठी जायचे होते, असे सांगण्यात आले. त्यानंतर निघण्याच्या तीन दिवस आधी प्रशिक्षक आरके शर्मा यांनी मला फोन केला आणि सांगितले की तिला (महिला सायकलपट्टू) तिच्यासोबत खोली शेअर करावी लागेल. हे ऐकून मला धक्काच बसला आणि खूप स्ट्रेसमध्ये गेले, मी फिजिओशीही बोलले.

सायकलपटू म्हणाली, मी दोन दिवसांनी स्लोव्हेनियाला जाण्यासाठी फ्लाइट पकडली आणि तिथे काही वेगळी व्यवस्था होईल असा विचार केला होता. पण हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर मला वेगळी खोली नाकारण्यात आली. प्रशिक्षक आरके शर्मा ( Head Coach RK Sharma ) तिच्याशी उद्धटपणे बोलले आणि तिला धमकावले की त्यांना हवे असेल तर ती शिबिरातही येऊ शकली नसती. मात्र, नंतर मला वेगळी खोली देण्यात आली, त्यामुळे प्रशिक्षक चांगलेच संतापले आणि त्यांनी माझे करिअर संपवण्याची धमकी देण्यास सुरुवात केली.

सायकलपट्टूने सांगितले की, 19 मे रोजी प्रशिक्षकाने त्याला मसाजसाठी खोलीत बोलावले, इतकेच नाही तर 29 मे रोजी प्रशिक्षकाने जबरदस्तीने तिच्या खोलीत घुसून जबरदस्ती करण्यास सुरूवात केली. त्यानंतर मी स्वतःला सावरले आणि नंतर या संपूर्ण प्रकरणाची तक्रार केली. त्यानंतर मी परत येण्याचा निर्णय घेतला, मी परत येत असतानाही प्रशिक्षकाने मला धमकावले.

भारतीय संघात पाच पुरुष आणि एक महिला सायकलपट्टू असून आधीच्या वेळापत्रकानुसार ते स्लोव्हेनियाहून 14 जून रोजी परतणार होते. SAI ने यापूर्वीच आरोप करणाऱ्या सायकलपट्टूला परत बोलावले आहे आणि या प्रकरणाच्या चौकशीसाठी चौकशी समिती स्थापन केली आहे. सीएफआयचे अध्यक्ष ओंकार सिंग ( CFI Chairman Omkar Singh ) यांनी पीटीआयला सांगितले की, SAI ने सध्याचा दौरा मध्यंतरी संपवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशिक्षक आरके शर्मा यांच्यासह संपूर्ण संघाला स्लोव्हेनियातून तातडीने परत बोलावण्यात येणार आहे.

हेही वाचा - PM Modi Congratulates Avani & Sriharsha : पंतप्रधान मोदींकडून नेमबाज अवनी आणि श्रीहर्षचे अभिनंदन

Last Updated : Jun 8, 2022, 10:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.