ETV Bharat / sports

नागपुरच्या अल्फिया पठाणची जागतिक युवा बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत 'सुवर्ण' कमाई

पोलंड येथे झालेल्या जागतिक युवा बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत नागपुरची लेक अल्फिया पठाण हिने ८१ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकलं.

indian boxer alfiya pathan wins gold medal at adriatic pearl boxing tournament
नागपूरच्या अल्फिया पठाणची जागतिक युवा बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत 'सुवर्ण' कमाई
author img

By

Published : Apr 24, 2021, 4:36 PM IST

मुंबई - पोलंड येथे झालेल्या जागतिक युवा बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत नागपुरची लेक अल्फिया पठाण हिने ८१ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकलं. यासह अल्फिया युवा वल्ड चॅम्पियन ठरली. तिच्या या यशाचे कौतूक राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी केलं.

सुनील केदार म्हणाले, अल्फिया पठाण हिने सुवर्णपदक पटकावून समस्त देशाची मान उंचावली आहे. अल्फियाला शासनाकडून ३ लाख रोख रक्कमेचा पुरस्कार देण्याकरिता प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना विभागाला दिल्या आहेत. तसेच पुढील स्पर्धांच्या सरावासाठी तिला अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

दरम्यान, अल्फियाने गुरुवारी पोलंडमधील किल्स येथे झालेल्या एआयबीए पुरुष आणि महिलांच्या जागतिक युवा बॉक्सिंग स्पर्धेत युवा चॅम्पियन बनली. ज्युनिअर आशियाई विजेती अल्फियाने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील अनुभवी असलेल्या माल्डोवाच्या डारिया ला तीनही फेऱ्या मध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित करुन पाचही पंचांना आपल्या बाजूने ५-० अशा फरकाने निर्णय द्यायला भाग पाडून विजय प्राप्त केला.

हेही वाचा - महाराष्ट्राच्या लेकीने ८०९१ मीटर उंच अन्नपूर्णा शिखर केले सर, ठरली पहिली भारतीय महिला

हेही वाचा - आशियाई कुस्ती चॅम्पियनशीप : दीपक पुनियाचे सुवर्णपदक हुकले, रौप्य पदकावर समाधान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.