नवी दिल्ली - भारत २०२२ मध्ये राष्ट्रकुल नेमबाजी व तिरंदाजी स्पर्धेचे आयोजन करणार आहे. कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशनने (सीजीएफ) सोमवारी निवेदन पाठवून याविषयी माहिती दिली.
हेही वाचा - स्क्वॉश : १८ वर्षाचा यश फडतेने पटकावले फ्रेंच ज्युनियर ओपनचे जेतेपद
'या दोन्ही चॅम्पियनशिपमध्ये जिंकली गेलेली पदके बर्मिंगहॅम २०२२ मध्ये खेळल्या जाणाऱया राष्ट्रकुल क्रीडा पदकांमध्ये समाविष्ट केली जातील', असे सीजीएफने म्हटले आहे. राष्ट्रकुल स्पर्धा बर्मिंगहॅममध्ये २७ जुलै ते ७ ऑगस्ट दरम्यान पार पडतील.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सीजीएफचे अध्यक्ष लुइस मार्टिन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड ग्रॅव्हबर्ग यांनी भारत दौरा केला होता. त्यानंतरच भारताने २०२२ मध्ये राष्ट्रकुल नेमबाजी व तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्याचा प्रस्ताव ठेवला होता.