पुणे: श्रीलंका (India Vs Sri Lanka) विरुद्धच्या तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील (Arshdeep 3 No Balls) दुसऱ्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. (Arshdeep 3 No Balls In a Row) वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगचे (Arshdeep Singh) संघात पुनरागमन चांगले झाले नाही. डावाच्या दुसऱ्या षटकात नो-बॉलची हॅट्ट्रिक करणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. (Arshdeep Singh New Record) टी-20 सामन्यात सर्वाधिक नो-बॉल टाकण्याचा विक्रम अर्शदीपच्या नावावर आहे. (IND vs SL Series ) अर्शदीप 22 टी-20 मध्ये 14 नो बॉल टाकणारा खेळाडू ठरला आहे.
5 नो-बॉल टाकून, तो आता T20I मध्ये 5 नो-बॉल टाकणारा हॅमिश रदरफोर्ड नंतर दुसरा ICC गोलंदाज बनला आहे. श्रीलंकेचा सलामीवीर कुसल मेंडिसने त्याच्या नो बॉलवर मिळालेल्या फ्री हिटचा फायदा घेत एक चौकार आणि एक षटकार ठोकला आहे. अर्शदीपने षटकात 37 धावा लुटले आहे, ज्यामुळे श्रीलंकेने पहिल्या डावात 206 धावा केल्या आहेत. तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या टी-20 सामन्यात कर्णधार दासून शनाकाच्या संघाने भारताविरुद्ध 206/6 धावा केल्या. श्रीलंकेसाठी शनाकाने 22 चेंडूत नाबाद 56 धावा केल्या, तर अस्लंका आणि मेंडिस यांनी अनुक्रमे 37 आणि 52 धावांची तुफानी खेळी खेळली आहे. या सामन्यात भारताने एकूण 7 नो बॉल टाकले होते.
यादव आणि अक्षर यांची अर्धशतके कामी आली नाही: भारताकडून सूर्यकुमार यादव आणि अक्षर पटेल यांनी अर्धशतकी खेळी खेळली आहे. याआधी श्रीलंकेकडून कुशल मेंडिस आणि दासून शनाका यांनी अर्धशतकी खेळी खेळली. भारताकडून उमरान मलिकने दोन बळी घेतले आहे. आठवी विकेट : शिवम मावी २६ धावा करून बाद झाला. त्याने 15 चेंडूंचा सामना केला. सातवी विकेट: अक्षर पटेल 65 धावा करून बाद झाला. त्याने 31 चेंडूंचा सामना केला आहे. सहावी विकेट : सूर्यकुमार यादव ५१ धावा करून बाद झाला आहे. त्याने 36 चेंडूंचा सामना करत 3 चौकार आणि 3 षटकार ठोकले आहे. दिलशान मदुशंकाने त्याला हसरंगाच्या हातून झेलबाद केले. पाचवी विकेट : दीपक हुडाच्या रूपाने भारताला पाचवा धक्का बसला. वनिंदू हसरंगाने त्याला धनंजय डिसिल्वाकरवी झेलबाद केले. दीपक हुडाने 12 चेंडूत 9 धावा केल्या आहेत. चौथी विकेट : कर्णधार हार्दिक पंड्या 12 चेंडूत 12 धावा करून बाद झाला. 34 धावांच्या स्कोअरवर भारताची चौथी विकेट पडली. त्याने आपल्या डावात एक चौकार आणि एक षटकार ठोकला. चमिका करुणारत्नेच्या चेंडूवर कुशल मेंडिसने त्याचा शानदार झेल घेतला आहे. तिसरी विकेट: २०७ धावांच्या धावसंख्येचा पाठलाग करताना भारताची तिसरी विकेट २१ धावांवर पडली. राहुल त्रिपाठी पाच चेंडूत 5 धावा करून बाद झाला आहे. मधुशंकाने त्याला यष्टिरक्षक कुशल मेंडिसकरवी झेलबाद केले आहे. दुसरी विकेट : भारताची दुसरी विकेट 20 धावांच्या स्कोअरवर पडली. शुभमन गिल तीन चेंडूत पाच धावा करून बाद झाला आहे. कसून रजिताने त्याला महिष तिक्ष्णाने झेलबाद केले. पहिली विकेट : भारताची पहिली विकेट 12 धावांवर पडली. इशान किशन पाच चेंडूत दोन धावा करून बाद झाला आहे. कासून रजिताने त्याला आतल्या चेंडूवर क्लीन बोल्ड केले.
श्रीलंकेचा डाव सहावी विकेट : उमरान मलिकने दोन चेंडूत सलग दोन विकेट घेतल्या. अस्लंकाला बाद केल्यानंतर त्याने पहिल्याच चेंडूवर वनिंदू हसरंगालाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले. हसरंगाला खातेही उघडता आले नाही.
पाचवी विकेट : उमरान मलिकने अस्लंकेला शुभमन गिलकरवी झेलबाद करून श्रीलंकेला पाचवा धक्का दिला. असलंकाने 19 चेंडूत 37 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 4 षटकार मारले. चौथा विकेट : 110 धावांच्या स्कोअरवर श्रीलंकेच्या संघाला चौथा धक्का बसला आहे. धनंजय डिसिल्वा सहा चेंडूत तीन धावा करून बाद झाला आहे. अक्षर पटेलच्या चेंडूवर दीपक हुडाने त्याचा झेल घेतला आहे. तिसरी विकेट: अक्षर पटेलने पथुम निशांकाला राहुल त्रिपाठीकरवी झेलबाद केले. 96 धावांच्या स्कोअरवर श्रीलंकेची तिसरी विकेट पडली. निशांकने 35 चेंडूत 33 धावा केल्या. दुसरी विकेट: उमरान मलिकने भानुका राजपक्षेला क्लीन बोल्ड करून श्रीलंकेला दुसरा धक्का दिला. राजपक्षेने तीन चेंडूत दोन धावा केल्या. 83 धावांवर श्रीलंकेच्या संघाची दुसरी विकेट पडली. पहिली विकेट : 80 धावांवर श्रीलंकेची पहिली विकेट पडली. युझवेंद्र चहलने कुशल मेंडिसला एलबीडब्ल्यू आऊट केले. मेंडिसने 31 चेंडूत 52 धावा केल्या. दोन्ही संघातील 11 खेळत आहे. भारत: इशान किशन (यष्टीरक्षक), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, राहुल त्रिपाठी, हार्दिक पांड्या (कर्णधार), दीपक हुडा, अक्षर पटेल, शिवम मावी, उमरान मलिक, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल. श्रीलंका: पाथुम निसांका, कुशल मेंडिस (विकेटकीपर), धनंजया डिसिल्व्हा, चरित अस्लंका, भानुका राजपक्षे, दासुन शनाका (क), वनिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, महेश तिक्ष्णा, कसून रजिथा, दिलशान मदुशंका.