ETV Bharat / sports

ICC Women T20 World Cup 2023 : केपटाऊनमध्ये रंगणार भारत विरुद्ध पाकिस्तान सामना; टीम इंडिया जिंकू शकते सामना - या प्रमुख खेळाडू डाव पलटवू शकतात

महिला T20 विश्वचषक 2023 मध्ये, भारतीय संघ 12 फेब्रुवारी रोजी पाकिस्तान विरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. चाहत्यांना नेहमीच भारत-पाकिस्तानच्या सामन्याची प्रतिक्षा असते. विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय संघाच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत. या सामन्यात भारतीय संघाचे महत्त्वाचे खेळाडू आपल्या चमकदार कामगिरीने पाकिस्तानला पराभूत करू शकतात. पाहुया सविस्तर रिपोर्ट.

Women T20 World Cup 2023
केपटाऊनमध्ये रंगणार भारत विरुद्ध पाकिस्तान सामना; टीम इंडिया जिंकू शकते सामना
author img

By

Published : Feb 11, 2023, 4:26 PM IST

नवी दिल्ली : आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2023 सुरू झाला आहे. या स्पर्धेतील पहिला सामना दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात शुक्रवार 10 फेब्रुवारी रोजी रात्री 11 वाजता झाला. या महिला T20 विश्वचषकात भारतीय संघ पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. हा सामना 12 फेब्रुवारी रोजी दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथे होणार आहे. या दोन संघांमधील हा सामना खूपच रोमांचक होऊ शकतो. या सामन्यात भारतीय संघाचे हे खेळाडू पाकिस्तानला जड जाऊ शकतात. त्यामुळे या खेळाडूंच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

केपटाऊनमध्ये होणार पाकिस्तानशी लढत : भारतीय संघ 12 फेब्रुवारीला केपटाऊनमध्ये संध्याकाळी 6.30 वाजता पाकिस्तान विरुद्ध सामना खेळणार आहे. या सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडू स्मृती मानधना, शेफाली वर्मा आणि रिचा घोष यांच्या कामगिरीवर चाहत्यांची नजर असेल. हे तिन्ही खेळाडू सामन्याला वळण लावू शकतात, त्यामुळे पाकिस्तानी संघाच्या अडचणी वाढतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.

या प्रमुख खेळाडू डाव पलटवू शकतात : महिला भारतीय संघाची स्टार सलामीवीर स्मृती मानधना पाकिस्तानविरुद्ध महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. मंधाना ही संघाची मुख्य फलंदाज आहे. मंधानाने भारतासाठी आतापर्यंत एकूण 11 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, त्यापैकी मंधानाने 27.32 च्या सरासरीने आणि 123.13 च्या स्ट्राइक रेटने एकूण 2651 धावा केल्या आहेत.

नुकताच भारताने महिला अंडर-19 विश्वचषक जिंकला : भारतीय संघाने अलीकडेच युवा सलामीवीर शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली महिला अंडर-19 विश्वचषक 2023 जिंकला आहे. अंडर-19 विश्वचषकात शेफाली वर्माने वेगवान फलंदाजी करताना 7 सामन्यात 193.26 च्या स्ट्राईक रेटने 172 धावा केल्या आहेत. शेफाली वर्मा सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. टीम इंडियाची यष्टिरक्षक रिचा घोषमध्ये सामन्याचा रंग एका क्षणात बदलण्याची ताकद आहे. रिचा घोषने भारतीय संघासाठी आतापर्यंत एकूण 30 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये तिने 134.27 च्या स्ट्राइकसह 427 धावा केल्या आहेत.

पहिल्या महिला विश्वचषक सामन्यात श्रीलंकेचा पराभव : आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2023 ची सुरुवात मोठ्या नाराजीने झाली आहे. या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात यजमान देशाला मोठा धक्का बसला आहे. महिला T20 विश्वचषकाचा सलामीचा सामना शुक्रवार, 10 फेब्रुवारी रोजी दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात खेळला गेला. या सामन्यात श्रीलंकेने दक्षिण आफ्रिकेचा 3 धावांनी पराभव केला. T20 क्रमवारीत 8व्या क्रमांकावर असलेल्या श्रीलंकेने पाचव्या क्रमांकावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. या स्पर्धेच्या सुरुवातीलाच दक्षिण आफ्रिकेच्या संघाला त्यांच्याच घरी पराभवाचा सामना करावा लागला होता.

हेही वाचा : Ind vs Aus First Test : रविचंद्रन अश्विनने कांगारूंचा पाडला फडशा; ऑस्ट्रेलियाच्या 64 धावांवर 6 विकेट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.