ETV Bharat / sports

'झरीनला घाबरत नाही, तिच्याशी दोन हात करायला तयार'

author img

By

Published : Oct 20, 2019, 8:13 AM IST

दोन दिवसांपूर्वी निखत झरीनने पुढील वर्षी चीनमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेसाठी भारतीय संघ निवडताना मेरी कोमला थेट स्थान देण्यात येऊ नये. मेरीविरुद्ध माझी निवड चाचणी घेण्यात यावी, अशी मागणी केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांच्याकडे केली होती. झरीनच्या या मागणीवर मेरी कोमने पहिल्यांदा भाष्य केले.

'झरीनला घाबरत नाही, तिच्याशी दोन हात करायला तयार'

नवी दिल्ली - भारतीय बॉक्सर मेरी कोम आणि निखत झरीन यांच्यातील वाद थांबण्याची शक्यता दिसत नाही. कनिष्ठ गटातील जागतिक विजेती निखत झरीनने सहावेळा विश्वविजेती ठरलेली मेरी कोमला पुढील वर्षी चीनमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेसाठी भारतीय संघ थेट स्थान न देता मेरीविरुद्ध माझी निवड चाचणी घेण्यात यावी, अशी मागणी केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांच्याकडे केली होती. झरीनशी दोन हात करायला मी घाबरत नाही. ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठी निवड चाचणीत तिला पराभूत करणे ही माझ्यासाठी फक्त औपचारिकता आहे, अशा शब्दांत मेरी कोमने झरीनचा खरपूस समाचार घेतला आहे.

दोन दिवसांपूर्वी निखत झरीनने पुढील वर्षी चीनमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेसाठी भारतीय संघ निवडताना मेरी कोमला थेट स्थान देण्यात येऊ नये. मेरीविरुद्ध माझी निवड चाचणी घेण्यात यावी, अशी मागणी केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांच्याकडे केली होती. झरीनच्या या मागणीवर मेरी कोमने पहिल्यांदा भाष्य केले.

भारतीय बॉक्सर निखत झरीन
भारतीय बॉक्सर निखत झरीन

याविषयी मेरी कोम म्हणाली की, 'झरीनला मी सॅफ स्पर्धेसह अनेक वेळा हरवले आहे. तरीही ती माझी लढण्याची भाषा करत आहे. ऑलिम्पिकमध्ये पदक कोण जिंकून देऊ शकतं, याची कल्पना भारतीय बॉक्सिंग महासंघाला असून यापूर्वी तिने माझ्यावर अशी टीका केली आहे. पण मी रिंगणात आपल्या कामगिरीद्वारे सर्वानाच उत्तर दिलं आहे.'

मी झरीनविरोधी नाही. तिनं चांगली कामगिरी करावी, असे मला वाटतं. आव्हान देणे सोपे असतं, पण कामगिरी करणं कठीण असतं. भारतीय बॉक्सिंग महासंघाने निर्णय घेतल्याने मी नियमात बदल करू शकत नाही. रिंगणात उतरून लढणं हेच माझे काम असून बीएफआयने घेतलेला निर्णय मला मान्य असेल. झरीनशी लढायला मी घाबरत नाही. निवड चाचणीत उतरायला मी तयार आहे. अशा शब्दात मेरी कोमने झरीनला सुनावले आहे.

Intro:Body:

sports marathi

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.