बोगोटा : कोलंबियाच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार फ्रेडी रिंकनचा कार अपघातात ( Freddy Rincon's car crashes ) गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला. रिंकन 55 वर्षांचे होते. कोलंबियातील केली येथे सोमवारी रिंकनची कार बसला धडकल्याने तो जखमी झाला होता.
कोलंबियन सॉकर फेडरेशनने ( Colombian Soccer Federation ) बुधवारी आपल्या वेबसाइटवर रिंकॉनच्या मृत्यूची बातमी पोस्ट केली आणि म्हणाले की, फुटबॉलपटूच्या निधनाबद्दल त्यांना मनापासून खेद वाटतो आणि त्याचे कुटुंब, मित्र आणि नातेवाईकांना शोक व्यक्त करणारा संदेश पाठवला आहे.
-
Many of you are sharing your personal memories.
— FIFA.com (@FIFAcom) April 14, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
For millions, it is this 1990 World Cup goal.
Into injury time, @FCFSeleccionCol needed a goal to draw the game and avoid elimination from the group stage. Then this happened... 🇨🇴💔pic.twitter.com/Mz8syMxLZ5
">Many of you are sharing your personal memories.
— FIFA.com (@FIFAcom) April 14, 2022
For millions, it is this 1990 World Cup goal.
Into injury time, @FCFSeleccionCol needed a goal to draw the game and avoid elimination from the group stage. Then this happened... 🇨🇴💔pic.twitter.com/Mz8syMxLZ5Many of you are sharing your personal memories.
— FIFA.com (@FIFAcom) April 14, 2022
For millions, it is this 1990 World Cup goal.
Into injury time, @FCFSeleccionCol needed a goal to draw the game and avoid elimination from the group stage. Then this happened... 🇨🇴💔pic.twitter.com/Mz8syMxLZ5
रिंकॉन हा 1990, 1994 आणि 1998 वर्ल्ड कपमध्ये खेळला होता. तो त्याच्या कारकिर्दी दरम्यान कोलंबिया आणि ब्राझीलमधील क्लबसाठी खेळला आहे. हा मिडफिल्डर रिअल माद्रिद, परमा आणि नेपोलीच्या संघाचाही भाग राहिला आहे.
फुटबॉलची जागतिक प्रशासकीय संस्था, फिफाने इटलीतील 1990 च्या विश्वचषकात रिंकॉनच्या सर्वात संस्मरणीय गोलांपैकी एका गोलचा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट करताना लिहिले: "जागतिक फुटबॉलमधील अनेक लोकांसह, आम्हाला फ्रेडी रिंकनची आठवण येते.''
आयओसी सदस्य अॅलेक्स गिलाडी यांचे निधन - आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे ( International Olympic Committee ) इस्रायलचे सदस्य अॅलेक्स गिलाडी यांचे ( Alex Giladi passes away ) बुधवारी लंडनमध्ये निधन झाले. ते 79 वर्षांचे होते. IOC ने गुरुवारी गिलाडीच्या मृत्यूची घोषणा केली. त्यांनी यापूर्वी एनबीसी स्पोर्ट्समध्ये वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणूनही काम केले आहे.
आयओसीच्या मते, फुटबॉल आणि बास्केटबॉल खेळल्यानंतर गिलाडीने आपल्या कारकिर्दीत बराचसा काळ टेलिव्हिजनसाठी काम केले. 1984 मध्ये त्यांची रेडिओ आणि टीव्ही कमिशनमध्ये नियुक्ती झाली होती आणि 10 वर्षांनंतर ते आयओसी सदस्य झाले होते.
-
The International Olympic Committee is deeply saddened to learn of the death of IOC Member Alex Gilady at the age of 79.
— IOC MEDIA (@iocmedia) April 14, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read here 👉https://t.co/Xyzs6Or6sR pic.twitter.com/uAvjtK8wN1
">The International Olympic Committee is deeply saddened to learn of the death of IOC Member Alex Gilady at the age of 79.
— IOC MEDIA (@iocmedia) April 14, 2022
Read here 👉https://t.co/Xyzs6Or6sR pic.twitter.com/uAvjtK8wN1The International Olympic Committee is deeply saddened to learn of the death of IOC Member Alex Gilady at the age of 79.
— IOC MEDIA (@iocmedia) April 14, 2022
Read here 👉https://t.co/Xyzs6Or6sR pic.twitter.com/uAvjtK8wN1
ऑस्ट्रेलियाचे आयओसी सदस्य जॉन कोट्स ( IOC member John Coates ) यांनी सांगितले की, बुधवारी त्यांचे लंडनमध्ये निधन झाले. मात्र, त्यांच्या मृत्यूचे कारण यात देण्यात आलेले नाही. आयओसीचे अध्यक्ष थॉमस बाख म्हणाले, "अॅलेक्स गिलाडी यांच्या निधनाने ( Death of Alex Giladi ), आम्ही आधुनिक ऑलिम्पिक चळवळीचे प्रमुखाला, विशेषत: प्रसारणाच्या संदर्भात गमावले आहे."
हेही वाचा - Reykjavik Open Chess Tournament : प्रज्ञानानंदने रेकजाविक ओपन बुद्धिबळ स्पर्धेचे पटकावले विजेतेपद