दोहा : फिफा विश्वचषक २०२२ चा चौथा दिवस ( FIFA World Cup 2022 ) असून, आज तीन सामने होणार ( FIFA World Cup 2022 Today Match ) आहेत. पहिला सामना मोरोक्को आणि क्रोएशिया ( MOROCCO vs CROATIA ) यांच्यात अल बेट स्टेडियमवर होणार आहे. दुसरा सामना जर्मनी आणि जपान यांच्यात ( GERMANY vs JAPAN ) संध्याकाळी 6.30 वाजता खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आणि तिसरा सामना स्पेन आणि कोस्टा रिका ( SPAIN vs COSTA RICA ) यांच्यात अल थुमामा स्टेडियमवर होणार आहे.
हे संघ आमने-सामने : प्रथम आपण मोरोक्को आणि क्रोएशिया यांच्यातील सामन्याबद्दल बोलू. दोन्ही संघ आतापर्यंत फक्त एकदाच आमने-सामने आले आहेत आणि तो सामना क्रोएशियाने जिंकला आहे. क्रोएशियाला बेल्जियम, कॅनडा आणि मोरोक्कोसह एफ गटात स्थान देण्यात आले आहे. मोरोक्कोने पहिला सामना मोरोक्को आणि क्रोएशिया यांच्यात अल बेट स्टेडियमवर दुपारी 3.30 वाजता सुरू होणार. तर दुसरा जर्मनी विरुद्ध जपान सामना संध्याकाळी 6.30 वाजता खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. तिसरा सामना स्पेन विरुद्ध कोस्टा रिका यांच्यात होणार आहे.
संभाव्य मोरोक्कन संघ : यासिन बौनो, अचराफ हकीमी, रोमेन सैस, अचराफ दारी, नुसैर मजरूई, सोफियान अमराबत, अब्देलहमिद साबिरी, एलियास चेयर, हकीम झिएच, युसेफ एन-नेसरी, सोफियान बौफल.मोरोक्कोने गेल्या पाचपैकी चार सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर क्रोएशियाने आपले मागील पाच सामने जिंकले आहेत.
संभाव्य क्रोएशिया संघ : डॉमिनिक लिव्हकोविक, जोसिप जुरानोविक, डेजान लोव्हरेन, जोस्को गार्डिओल, बोर्ना सोसा, मार्सेलो ब्रोझोविक, लुका मॉड्रिक, माटेओ कोव्हासिक, मारिओ पासालिक, आंद्रेज क्रॅमरिक, इव्हान पेरिसिक. मोरोक्को आणि क्रोएशिया यांच्यातील सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग JioCinema अॅप आणि वेबसाइटवर केले जाईल.
हेही वाचा : FIFA World Cup 2022 : फिफा फुटबाॅलमध्ये आज डाव पलटला; सौदी अरेबियाकडून बलाढ्य अर्जेंटिनाचा 2-1 ने पराभव