ETV Bharat / sports

खेलो इंडिया..! द्युतीला दुसरे सुवर्ण तर, मुंबईच्या कीर्ती भोईटेला रौप्यपदक - द्युती चंद सुवर्णपदक न्यूज

कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजीचे (केआयआयटी) प्रतिनिधीत्व करत असलेल्या २४ वर्षीय द्युतीने २३.६६ सेकंदाची वेळ नोंदवली. तर, मुंबई विद्यापीठाची धावपटू कीर्ती विजय भोईटेने २४.९८ सेकंदाची वेळ घेत रौप्यपदक पटकावले.

Dutee Chand wins second gold in Khelo India University Games
द्युतीला दुसरे सुवर्ण तर, मुंबईच्या कीर्ती भोईटेला रौप्यपदक
author img

By

Published : Mar 2, 2020, 7:32 AM IST

भुवनेश्वर - नुकत्याच पार पडलेल्या 'खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स'च्या पहिल्या हंगामात भारताची आघाडीची धावपटू द्युती चंदने दुसरे सुवर्णपदक पटकावले. द्युतीने २०० मीटर स्पर्धेत ही कामगिरी केली.

हेही वाचा - ...तोपर्यंत भारतीय संघाला 'महान' म्हटले जाणार नाही

कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजीचे (केआयआयटी) प्रतिनिधीत्व करत असलेल्या २४ वर्षीय द्युतीने २३.६६ सेकंदाची वेळ नोंदवली. तर, मुंबई विद्यापीठाची धावपटू कीर्ती विजय भोईटेने २४.९८ सेकंदाची वेळ घेत रौप्यपदक पटकावले.

  • We continue to be proud! India's fastest woman Dutee Chand, representing KIIT clinched gold in both 100m and 200m dash ! Congratulations Dutee, you make Odisha shine! pic.twitter.com/1iv9EmLcaV

    — KIIT - Kalinga Institute of Industrial Technology (@KIITUniversity) March 1, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

उत्कल विद्यापीठाच्या दीपाली महापात्राने २५.१९ वेळ घेत कांस्यपदक जिंकले. '२०० मीटरमध्ये सुवर्ण जिंकणे खूप चांगले वाटले. १०० मीटर मध्ये, पूर्ण थ्रॉटलमध्ये कधी धावायचे आणि थोडासा आराम कधी करायचा हे समजणे कठीण आहे, परंतु २०० मीटरमध्ये, कधी वेगाने धावणे आणि कधी आराम करायचा हे समजणे सोपे आहे. मात्र, धावपटूला २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत जास्त काम करावे लागते, 'असे द्युतीने विजयानंतर सांगितले.

यापूर्वी, तिसऱ्या लेनमध्ये धावणाऱ्या द्युतीने १०० मीटर स्पर्धेत ११.४९ सेकंदाची वेळ नोंदवत सुवर्णपदक जिंकले होते. यापूर्वी, तिने गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरमध्ये ११.२२ सेंकदाची विक्रमी वेळ नोंदवली होती. ऑलिम्पिक पात्रता गाठण्यासाठी ११.१५ सेंकदाची वेळ ठेवण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.