नवी दिल्ली - पॅरालिम्पिक गेम्समध्ये पदक जिंकणारी देशातील पहिली महिला खेळाडू दीपा मलिक यांची भारताच्या पॅरालिम्पिक समितीच्या (पीसीआय) अध्यक्षपदी निवड झाली आहे. मात्र, ही निवडणूक उच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या सुनावणीनंतरच वैध ठरणार आहे.
-
(1/2) My heartiest congratulations on the commencement of new innings of a fresh tenure in @ParalympicIndia. Expressing my gratitude on being trusted with the Presidentship and welcoming an athlete centric approach in para sports in India. https://t.co/oqIj2EM7Lk
— Deepa Malik (@DeepaAthlete) February 1, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">(1/2) My heartiest congratulations on the commencement of new innings of a fresh tenure in @ParalympicIndia. Expressing my gratitude on being trusted with the Presidentship and welcoming an athlete centric approach in para sports in India. https://t.co/oqIj2EM7Lk
— Deepa Malik (@DeepaAthlete) February 1, 2020(1/2) My heartiest congratulations on the commencement of new innings of a fresh tenure in @ParalympicIndia. Expressing my gratitude on being trusted with the Presidentship and welcoming an athlete centric approach in para sports in India. https://t.co/oqIj2EM7Lk
— Deepa Malik (@DeepaAthlete) February 1, 2020
रिओ ऑलिम्पिकमधील गोळा फेक (एफ-53) स्पर्धेत रौप्यपदक जिंकणार्या ४९ वर्षीय दीपा यांना शुक्रवारी बेंगळुरू येथे झालेल्या निवडणुकीत बिनविरोध अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. या नियुक्तीसाठी दीपा यांनी ट्विटवरून आभार मानले आहेत. 'माझ्यासाठी ही मोठी संधी असेल. मी आशा करतो की तुमचा पाठिंबा मला नेहमी असेल. मी माझ्या कर्तव्यासाठी नेहमी तत्पर असेन', असेही दीपाने म्हटले आहे.
माजी अध्यक्ष राव इंदरजीत सिंग यांना हटवल्यानंतर कार्यवाह अध्यक्ष म्हणून नियुक्त झालेल्या गुरशरण सिंग यांची बिनविरोध सरचिटणीसपदी निवड झाली. उपाध्यक्षपदी कविंदर चौधरी आणि शशी रंजन यांची निवड झाली आहे. तर, एम महादेव कोषाध्यक्षपदी निवडले गेले आहेत. सहसचिव म्हणून नेले नंदकिशोर बाबुराव आणि कांतीलाल परमार यांची निवड झाली आहे.
हेही वाचा - 'टी-२०' क्रिकेटमध्ये बुमराहने नोंदवला मोठा विक्रम!