ETV Bharat / sports

Deaflympics 2021 : दिक्षा डागरने अंतिम फेरीत अमेरिकेच्या गोल्फपटूचा पराभव करत जिंकले सुवर्णपदक

देशाच्या 21 वर्षीय गोल्फर दीक्षा डागरने ब्राझील डेफलिंपिक 2021 मध्ये अमेरिकेच्या ऍश्लिन ग्रेस जॉन्सनला हरवून सुवर्णपदक जिंकले आहे. डागरने पाच वर्षांपूर्वी 2017 मध्ये सॅमसन, तुर्कीमध्ये रौप्य पदक जिंकले होते.

Diksha
Diksha
author img

By

Published : May 12, 2022, 4:40 PM IST

कॅक्सियास दो सुल (ब्राझील): भारताची गोल्फपटू दीक्षा डागर ( Indian Golfer Diksha Dagar ) हिने डेफलिंपिक गोल्फ स्पर्धेच्या अंतिम फेरीत अमेरिकेच्या एशलिन ग्रेसचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. दीक्षाचे हे कर्णबधिरांसाठीचे ऑलिम्पिकमधील दुसरे पदक आहे. याआधी 2017 मध्ये तिने रौप्य पदक जिंकले होते. या खेळांमध्ये दोन पदके जिंकणारी ती पहिली गोल्फर ठरली आहे.

युरोपियन टूरमध्ये खेळलेल्या 21 वर्षीय दीक्षाने महिला गोल्फ स्पर्धेच्या मॅच प्ले प्रकारात अंतिम फेरीत पाच आणि चारने विजय नोंदवला. याचा अर्थ दीक्षा जेव्हा पाच होलमध्ये (छिद्र) जिंकली तेव्हा चार होल (छिद्रे) शिल्लक होती. 2017 मध्ये जेव्हा प्रथमच बधिर ऑलिंपिकमध्ये गोल्फचा समावेश करण्यात आला, तेव्हा दीक्षाने सहजपणे अंतिम फेरी गाठली. मात्र अमेरिकेच्या योस्ट कीलिनने तिला हरवून सुवर्णपदक पटकावले आणि भारतीय खेळाडूला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

दिक्षा गेल्या वर्षी टोकियो डेफलिंपिकसाठी पात्र ठरली होती आणि लेडीज युरोपियन टूरवर तिने वैयक्तिक विजेतेपद पटकावले आहे. लेडीज युरोपियन टूरवर सांघिक स्पर्धा जिंकणाऱ्या संघाचाही ती भाग आहे. दरम्यान, फ्रान्सच्या मार्गो ब्रेजोने तिसऱ्या प्लेऑफमध्ये 2017 च्या कांस्यपदक विजेत्या नॉर्वेच्या अँड्रिया होव्हस्टेन हेल्गेर्डेला अत्यंत चुरशीच्या लढतीत पराभूत करून कांस्यपदक जिंकले. अशाप्रकारे आंद्रियाचे दुसरे पदक जिंकण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.

हेही वाचा - IPL 2022 RR vs DC : नशिबाची साथ न मिळाल्याने पराभव स्विकारावा लागला - संजू सॅमसनचे वक्तव्य

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.