नवी दिल्ली : पोर्तुगालचा करिश्माई फॉरवर्ड ख्रिस्तियानो रोनाल्डोने मँचेस्टर युनायटेड ( Manchester United ) क्लबपासून फारकत घेतली ( Cristiano Ronaldo leave Manchester United ) आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार आणि अनुभवी फुटबॉलपटू वेन रुनीने याबद्दल दु:ख व्यक्त केले ( Cristiano Ronaldo has Parted Ways with Manchester United Club ) आहे. मंगळवारी रात्री मँचेस्टर युनायटेडने त्यांच्या सोशल मीडियाद्वारे घोषित केले की रोनाल्डो तत्काळ प्रभावाने परस्पर कराराने क्लब सोडणार आहे. संघासोबत दोन हंगाम घालवल्याबद्दल आणि उत्तम योगदान दिल्याबद्दल क्लब त्याचे आभार मानतो.
-
Cristiano Ronaldo is to leave Manchester United by mutual agreement, with immediate effect.
— Manchester United (@ManUtd) November 22, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
The club thanks him for his immense contribution across two spells at Old Trafford.#MUFC
">Cristiano Ronaldo is to leave Manchester United by mutual agreement, with immediate effect.
— Manchester United (@ManUtd) November 22, 2022
The club thanks him for his immense contribution across two spells at Old Trafford.#MUFCCristiano Ronaldo is to leave Manchester United by mutual agreement, with immediate effect.
— Manchester United (@ManUtd) November 22, 2022
The club thanks him for his immense contribution across two spells at Old Trafford.#MUFC
टिव्ही मुलाखतीत रोनाल्डोने व्यवस्थापकावर आणि मॅंचेस्टर क्लबवर केले होते आरोप : कतार येथे सुरू असलेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेत पोर्तुगालचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निघण्यापूर्वी एका टीव्ही मुलाखतीत पोर्तुगीज स्टारने याआधी क्लब आणि मुख्य प्रशिक्षक एरिक टेन हाग यांच्याविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केल्यानंतर ही घोषणा झाली.
रोनाल्डो हा सर्वकाळातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक : मी बर्याच वेळा सांगितले आहे की, रोनाल्डो हा सर्वकाळातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे.” रुनीने स्पोर्ट्स 18 च्या व्हिसा मॅच सेंटरच्या माध्यमाला सांगितले. त्याला अशा प्रकारे क्लब सोडताना पाहून वाईट वाटले. रोनाल्डो ऑगस्ट 2021 मध्ये क्लबमध्ये सामील झाला. तसेच त्याने गेल्या मोसमात 24 गोल केले. तो म्हणाला होता की क्लबने त्याला संघातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता. जिथे त्याला 'विश्वासघात' वाटला आणि युनायटेड मॅनेजर एरिक टेन हाग यांच्याबद्दल मला आदर नाही कारण त्याने माझ्याबद्दल आदर दाखवला नाही.
कतारमध्ये चांगली स्पर्धा झाल्यास संघांना रोनाल्डोला साईन करावेसे वाटेल, असे रुनीला वाटले. रोनाल्डोचे 117 आंतरराष्ट्रीय गोल आहेत. गुरुवारपासून घानाविरुद्ध सुरू होणाऱ्या फिफा विश्वचषक 2022 मध्ये संघाच्या मोहिमेत रोनाल्डो पोर्तुगालचे नेतृत्व करेल.