नवी दिल्ली : पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोवर (Cristiano Ronaldo) दोन सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे. (Cristiano Ronaldo ban). तसेच त्याला 42 लाख 65 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. त्याने एव्हर्टन विरुद्धच्या सामन्यात एका चाहत्याच्या हातातून मोबाईल हिसकावून तो फोडला होता. त्या प्रकरणी त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
पराभवानंतर झाला होता संतप्त: या वर्षी 9 एप्रिल रोजी, रोनाल्डोचा मॅंचेस्टर युनायटेड संघ गॉडिसन पार्क येथे एव्हर्टन संघाकडून 1-0 ने हरला होता. यानंतर रोनाल्डो मैदानाबाहेर आला तेव्हा एक चाहता त्याचा व्हिडिओ बनवत होता. संघाच्या पराभवामुळे संतप्त झालेल्या रोनाल्डोला ते आवडले नाही. त्याने फॅनचा मोबाईल हिसकावून तो फोडला. या वादानंतर एफएने त्याच्यावर अयोग्य वर्तनाचा आरोप केला होता. या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.
बंदी विश्वचषकाला लागू होणार नाही: रोनाल्डो वरील या बंदीचा त्याच्या फिफा विश्वचषका मधील कॅंपेन वर कोणताही फरक पडणार नाही. ही बंदी विश्वचषकाला लागू होणार नाही कारण, फुटबॉल असोसिएशनने ही बंदी घातली आहे. रोलाल्डोच्या वर्तवणुकीनंतर व्हिडिओ बनवणाऱ्या फॅनच्या हाताला दुखापत झाली होती. त्यानंतर रोनाल्डोनेही आपले वर्तन अयोग्य असल्याचे मान्य केले होते.