ETV Bharat / sports

टिक-टॉक बंदीनंतर हिना सिद्धूने व्यक्त केला आनंद - heena sidhu latest on tik tok ban

हिना म्हणाली, "टिक-टॉकवर बंदी घातल्याबद्दल मला खूप आनंद झाला आहे. टिक-टॉकवर द्वेष वाटणारे आणि प्राण्यांबद्दल नकारात्मक व्हिडिओ मी पाहिले होते. टिक-टॉकशिवाय इंटरनेट खूप आनंददायक असेल."

Commonwealth gold medalist shooter heena sidhu speaks about tiktok ban
टिक-टॉक बंदीनंतर हिना सिद्धूने व्यक्त केला आनंद
author img

By

Published : Jul 1, 2020, 11:52 AM IST

नवी दिल्ली - राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक विजेती भारतीय महिला नेमबाजपटू हिना सिद्धूने चीनी अ‌ॅप टिक-टॉक बंद झाल्यामुळे आनंद व्यक्त केला आहे. भारत सरकारने सोमवारी 59 चीनी अ‌ॅप्सवर बंदी घातली. टिक-टॉक हे अ‌ॅपही या यादीत समाविष्ट आहे.

हिना म्हणाली, "टिक-टॉकवर बंदी घातल्याबद्दल मला खूप आनंद झाला आहे. टिक-टॉकवर द्वेष वाटणारे आणि प्राण्यांबद्दल नकारात्मक व्हिडिओ मी पाहिले होते. टिक-टॉकशिवाय इंटरनेट खूप आनंददायक असेल."

ती म्हणाली, "हे अजून संपलेले नाही. परंतु मला आशा आहे की सरकार लवकरच यावर काही पावले उचलेल. अ‍ॅप निर्मात्यावरही काही जबाबदारी असावी. त्यांनी असे व्हिडिओ अपलोड करण्याची परवानगी का दिली? आणि असे व्हिडिओ व्हायरलही होतात. जोपर्यंत ते व्हिडिओ अपलोड करण्याचे नियम बदलत नाहीत, तोपर्यंत हे अॅप आपल्या आयुष्यात राहू नये."

टिक-टॉक आणि यूसी ब्राउझरसह 59 चीनी अ‌ॅप्सवर भारत सरकारने बंदी घातली आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम '69-अ'मध्ये दिलेल्या तरतुदींचा वापर करुन सरकारने हा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देशाच्या आणि देशातील नागरिकांच्या सुरक्षेला तसेच सार्वभौमत्वाला धोका पोहोचवणारी ही अ‌ॅप्स आहेत. त्यामुळे, या अ‌ॅप्सना देशात बंदी घालण्यात आली आहे.

या अ‌ॅप्सवर घालण्यात आली बंदी -

टिक-टॉक, शेअर-इट, क्वाई, यूसी ब्राऊजर, बायडू मॅप, शेईन, क्लॅश ऑफ किंग्स, डीयू बॅटरी सेव्हर, हेलो, लाईकी, यूकॅम मेकअप, एमआय कम्युनिटी, सीएम ब्राऊजर, व्हायरस क्लिनर, एपीयूएस ब्राऊजर, रोमवुई, क्लब फॅक्टरी, न्यूजडॉग, ब्यूट्रीप्लस, वुईचॅट, यूसी न्यूज, क्यूक्यू मेल, वेईबो, झेन्डर, क्यूक्यू म्युूझिक, क्यूक्यू न्यूजफीड, बिंगो लाईव्ह, सेल्फिसिटी, मेलमास्टर, पॅरलल स्पेस, एमआय व्हिडिओ कॉल, वुईसिंक, ईएस फाईल एक्सप्लोरर, व्हिवा व्हिडिओ, मेईटू, व्हिगो व्हिडिओ, न्यू व्हिडिओ स्टेटस, डीयू रेकॉर्डर, व्हॉल्ट - हाईड, कॅशे क्लीनर, डीयू क्लीनर, डीयू ब्राऊजर, हागो, कॅम स्कॅनर, क्लीन मास्टर, वंडर कॅमेरा, फोटो वंडर, क्यूक्यू प्लेयर, वुई मीट, स्वीट सेल्फी, बाईडू ट्रान्सलेट, व्ही-मेट, क्यूक्यू इंटरनॅशनल, क्यूक्यू सिक्युरिटी सेंटर, क्यूक्यू लॉंचर, यू व्हिडिओ, व्ही फ्लाय स्टेटस व्हिडिओ, मोबाईल लेजंड्स, डीयू प्रायव्हसी.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.