ETV Bharat / sports

Dope Test : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेपूर्वी भारताला मोठा धक्का; धावपटू धनलक्ष्मीसह दोन खेळाडू डोप चाचणीत नापास - Sports News

2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेपूर्वी भारताच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. कारण अव्वल धावपटू एस धनलक्ष्मीसह दोन खेळाडू डोप चाचणीत नापास झाले ( Two Indian players fail dope test ) आहेत.

Dhanalakshmi  Aishwarya
धनलक्ष्मी
author img

By

Published : Jul 20, 2022, 3:53 PM IST

नवी दिल्ली: भारतीय धावपटू एस धनलक्ष्मी ( Runner S Dhanalakshmi ) आणि तिहेरी उडी राष्ट्रीय विक्रम धारक ऐश्वर्या बाबू ( Record holder Aishwarya Babu ) यांना प्रतिबंधित पदार्थाचे सेवन केल्याबद्दल दोषी ( Convicted of consuming a prohibited substance ) आढळले आहे. ज्यामुळे खेळांपूर्वी भारतीय ऍथलेटिक्सवर सावली पडली आहे. 28 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या गेम्समध्ये दोघेही सहभागी होऊ शकणार नाहीत.

बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्ससाठी भारताच्या 36 जणांच्या संघात धनलक्ष्मी होती. जागतिक अ‍ॅथलेटिक्सच्या अ‍ॅथलेटिक्स इंटिग्रिटी युनिटने ( Athletics Integrity Unit of World Athletics ) घेतलेल्या चाचणीत ती बंदी घातलेले स्टिरॉइड्स सेवन केल्याप्रकरणी दोषी आढळली. एआययूने केलेल्या डोप चाचणीत धनलक्ष्मी पॉझिटिव्ह ( Dhanalakshmi positive in dope test ) आढळून आल्याचे एका उच्चपदस्थ सूत्राने सांगितले. ती बर्मिंगहॅम गेम्सला जाणार नाही. धनलक्ष्मी शंभर मीटर आणि चारशे मीटरमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार होती. युजीनच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी ती भारतीय संघातही होती, परंतु व्हिसाच्या समस्येमुळे ती जाऊ शकली नाही.

धनलक्ष्मीने 26 जून रोजी कोसानोव्ह मेमोरियल ऍथलेटिक्स मीटमध्ये 200 मीटरमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. तिने 22.89 सेकंद वेळ नोंदवली आणि राष्ट्रीय विक्रम धारक सरस्वती साहा (22.82 सेकंद) आणि हिमा दास (22.88 सेकंद) 23 सेकंदांपेक्षा कमी वेळ नोंदविल्यानंतर ती तिसरी भारतीय बनली होती. 24 वर्षीय ऐश्वर्याचे गेल्या महिन्यात चेन्नई येथे झालेल्या राष्ट्रीय आंतर-प्रांतीय ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप दरम्यान NADA अधिकाऱ्यांनी नमुने घेतले होते. तिच्या तपासणीचा निकाल पॉझिटिव्ह आला आहे.

ऐश्वर्याने चेन्नईमध्ये तिहेरी उडी मारून राष्ट्रीय विक्रम केला ( Aishwarya Babu triple jump record ) होता. तिने लांब उडीमध्ये 6.73 मीटर उडी मारली होती, जी अंजू बॉबी जॉर्ज (6.83 मीटर) नंतर भारतीय महिला लांब उडीपटूची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी होती. वास्तविक, डोप चाचणी ही मानवी शरीराची एक प्रकारची तपासणी आहे, ज्यामध्ये खेळाडू/अॅथलीट आपली कामगिरी सुधारण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी बंदी घातलेली औषधे वापरत आहेत की नाही हे शोधून काढले जाते.

हेही वाचा - Asian Games :आशियाई क्रीडा स्पर्धेच्या नवीन तारखा जाहीर; 'या' तारखेला होणार सुरुवात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.