नूर सुल्तान - कझाकिस्तान येथे सुरू असलेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत बजरंग पुनिया आणि रवी कुमार दहिया यांनी कांस्य पदक मिळवले. पुनियाचे हे जागतिक कुस्ती स्पर्धेतील तिसरे पदक ठरले. पुनियाने ६५ किलो वजनी गटात, तर रवी कुमारने ५७ किलो वजनी गटात पदक मिळवले.
गुरुवारी भारताच्या या दोन्ही खेळाडूंनी उपांत्य फेरीत प्रवेश मिळवत ऑलिंपिकमध्ये आपले स्थान निश्चित केले. मात्र, उपांत्य फेरीत कझाकिस्तानचा कुस्तीपटू दोलत नियाजबेकवने पुनियाचा पराभव केला. रुसच्या जोवुरने दहियाचा पराभव केला.
हेही वाचा - विश्व बॉक्सिंग चॅम्पियनशिप : फायनलमध्ये प्रवेश करणारा अमित पांघल ठरला पहिलाच भारतीय खेळाडू
कांस्य पदकासाठी झालेल्या सामन्यात मंगोलियाचा कुस्तीपटू तुलगा तुमुर ऑचीर याचा ८-७ ने पराभव करत पुनियाने पदक आपल्या नावे केले.