मुंबई : चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रंकीरेड्डी या भारतीय जोडीने इंडोनेशियाच्या फजर अल्फियान आणि मुहम्मद रियान अर्दियांटो यांचा पराभव करून कोरिया ओपन सुपर 500 बॅडमिंटनचे विजेतेपद पटकावले. या जोडीचे यंदाचे हे तिसरे विजेतेपद आहे. या विजेतेपदापूर्वी सात्विक आणि चिराग यांनी यावर्षी इंडोनेशिया सुपर 1000 आणि स्विस ओपन सुपर 500 विजेतेपद पटकावले होते.
सलग दुसरे विजेतेपद : अंतिम सामन्यात भारतीय जोडीने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या फजर अल्फियान आणि मुहम्मद रियान अर्दियांटो या जोडीचा १७-२१, २१-१३, २१-१४ असा पराभव केला. विशेष म्हणजे, पहिला सेट गमावल्यानंतर, भारतीय जोडीने जोरदार पुनरागमन करत हा विजय प्राप्त केला आहे. जूनमध्ये इंडोनेशिया ओपन स्पर्धा जिंकणाऱ्या सात्विक-चिरागचे हे सलग दुसरे विजेतेपद आहे.
सात्विक आणि चिराग यांचा सलग 10वा विजय : जागतिक क्रमवारीत तिसर्या स्थानावर असणाऱ्या भारतीय जोडीने सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेच्या रोमहर्षक अंतिम सामन्यात दोन वेळा जागतिक चॅम्पियनशिप कांस्यपदक विजेते अल्फियान आणि आर्डियंटो यांचा 17-21, 21-13, 21-14 असा पराभव केला. 2022 कॉमनवेल्थ गेम्स चॅम्पियन सात्विक आणि चिराग यांचा हा सलग 10वा विजय होता. या वर्षी स्विस ओपन, आशियाई चॅम्पियनशिप आणि इंडोनेशिया ओपनमध्ये विजय मिळवल्यानंतर भारतीय जोडीने आणखी एक विजेतेपदाची भर घातली आहे.
भारतीय जोडीची कमकुवत सुरुवात : या सामन्यात भारतीय जोडी सुरुवातीला थोडी कमकुवत दिसली आणि त्यांनी अनेक चुका केल्या. मात्र दुसऱ्या गेममध्ये सुरुवातीपासूनच भारतीय जोडीने आघाडी घेतली आणि आघाडी घेतल्यानंतर इंडोनेशियन खेळाडूंना पुनरागमनाची एकही संधी दिली नाही. त्यानंतर सात्विक आणि चिरागने तिसऱ्या गेममध्ये नियंत्रण मिळवले आणि सामना आपल्या खिशात घातला.
उपांत्य फेरीत रोमहर्षक विजय मिळाला : शनिवारी, भारतीय जोडीने लिआंग वेई केंग आणि वांग चांग या जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकाच्या चिनी जोडीवर रोमहर्षक गेममध्ये विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारतीय जोडीने जिन्नम स्टेडियमवर चाललेल्या ४० मिनिटांच्या लढतीत दुसऱ्या मानांकित चीनच्या जोडीवर २१-१५, २४-२२ असा विजय मिळवला. यापूर्वीच्या दोन पराभवानंतर सात्विक आणि चिराग या चिनी जोडीवरचा हा पहिला विजय होता.
सात्विक आणि चिराग यांची सुपरहीट जोडी : जोडी बनल्यापासून, सात्विक आणि चिराग यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्ण, थॉमस चषक स्पर्धेत सुवर्ण, जागतिक स्पर्धेत कांस्यपदक आणि सुपर ३०० (सय्यद मोदी आणि स्विस ओपन), सुपर ५०० (थायलंड आणि इंडिया ओपन), सुपर ७५० (फ्रेंच ओपन) आणि इंडोनेशिया ओपन सुपर १000 यासह अनेक विजेतेपदे जिंकली आहेत.
हेही वाचा :