ETV Bharat / sports

Badminton Asia Championships : सिंधू, सात्विक आणि चिराग उपांत्यपूर्व फेरीत, सायना आणि श्रीकांत बाहेर - युई यान जेस्लिन हुई

गिमचिओनमध्ये 2014 च्या आशिया चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या चौथ्या मानांकित सिंधूने जागतिक क्रमवारीत 100 व्या स्थानावर असलेल्या जेस्लिन हुईचा 42 मिनिटांत 21-16, 21-16 असा पराभव केला. पुढील फेरीत सिंधूचा सामना तिसरा मानांकित चीनच्या हेई बिंग झियाओशी होईल, जिला तिने पराभूत करून टोकियो ऑलिम्पिक कांस्यपदक जिंकले होते.

PV Sindhu
PV Sindhu
author img

By

Published : Apr 28, 2022, 7:38 PM IST

मनीला (फिलीपीन्स): दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूने ( Olympic medalist PV Sindhu ) गुरुवारी सिंगापूरच्या युई यान जेस्लिन हुई ( Yue Yan Jeslyn Hui ) हिचा सरळ गेममध्ये पराभव करत बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिपच्या महिला एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली. सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्या तिसऱ्या मानांकित भारतीय पुरुष दुहेरी संघानेही दुसऱ्या फेरीत विजय मिळवत अंतिम आठमध्ये प्रवेश केला. पण लंडन ऑलिम्पिकची कांस्यपदक विजेती सायना नेहवाल आणि जागतिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेता किदाम्बी श्रीकांत ( Silver medalist Kidambi Srikanth ) पराभवासह स्पर्धेतून बाहेर पडले.

गिमचेन येथे 2014 आशिया चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या चौथ्या मानांकित सिंधूने जागतिक क्रमवारीत 100 व्या स्थानावर असलेल्या जेस्लिन हुईचा 42 मिनिटांत 21-16, 21-16 असा पराभव केला. पुढील फेरीत सिंधूची लढत तिसऱ्या मानांकित चीनच्या हेई बिंग झियाओशी होईल, जिला तिने पराभूत करून टोकियो ऑलिम्पिक कांस्यपदक जिंकले आहे. सिंधूने बिंग जिओविरुद्ध सात सामने जिंकले आहेत, पण नऊ सामने गमावले आहेत. मात्र, गेल्या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय खेळाडूने बाजी मारली आहे.

सात्विक आणि चिराग या तिसर्‍या मानांकित भारतीय पुरुष दुहेरी जोडीने अकिरा कोगा आणि ताची सायटो या जपानी जोडीचा २१-१७, २१-१५ ( 21-17, 21-15 ) असा सरळ गेममध्ये पराभव केला. जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या भारतीय जोडीचा पुढील सामना मलेशियन जोडी अॅरोन चिया आणि सोह वुई यिक या पाचव्या मानांकित जोडी आणि सिंगापूरच्या डेनी बावा कृष्णांता आणि जुन लियांग अँडी क्वेक ( Jun Liang Andy Quake ) यांच्यातील विजेत्याशी होणार आहे.

प्रतिष्ठेच्या महाद्वीपीय स्पर्धेत चौथे पदक जिंकण्याचे सायनाचे स्वप्न भंगले. कारण तिला जागतिक क्रमवारीत १६व्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या २२ वर्षांच्या वांग शी यीकडून 21-12, 7-21, 13-21 असा पराभव पत्करावा लागला. दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या सायनाने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, आशियाई क्रीडा स्पर्धा आणि उबेर चषकाच्या ट्रायलमध्ये भाग घेतला नव्हता.

सातव्या मानांकित श्रीकांतलाही पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत खडतर लढतीत तीन गेममध्ये पराभव पत्करावा लागला. पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात एक तास 17 मिनिटे चाललेल्या सामन्यात त्याला चीनच्या वेंग हाँग यांगकडून 16-21, 21-17, 17-21 असा पराभव पत्करावा लागला. तत्पूर्वी, क्रमवारीत मोठा फरक असतानाही सिंधूला जेसलीन हुईने कडवी टक्कर दिली होती.

पहिल्या गेममध्ये एका वेळी सिंधू 7-9 अशी पिछाडीवर होती, पण ब्रेकपर्यंत तिने स्कोअर 10-11 असा कमी केला. सिंधूने मात्र 16-16 अशी बरोबरी साधत पुनरागमन करत पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये सिंधूने 12-8 अशी आघाडी घेतली पण सिंगापूरच्या खेळाडूने पुनरागमन करत स्कोअर 15-16 असा केला. मात्र, यानंतर सिंधूने दमदार खेळ दाखवत गेम आणि सामना जिंकला.

हेही वाचा - Cricketer Deepak Chahar : वेगवान गोलंदाज दीपक चहर गर्लफ्रेंडसोबत ऋषिकेशमध्ये, सेल्फीसाठी चाहत्यांची धावपळ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.