मेलबर्न : ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका (Australia vs South Africa) यांच्यात खेळल्या जात असलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना चौथ्या दिवशीच एक डाव आणि 182 धावांनी जिंकून मालिकेत अजिंक्य आघाडी घेतली. (Australia Win Second Test) याआधी ऑस्ट्रेलियाने गाबा येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातही (Australia vs South Africa 2nd Test) 2 दिवसांतच 6 विकेटने विजय मिळवला होता.
-
David Warner caps off an incredible 100th Test with the Johnny Mullagh Medal #AUSvSA pic.twitter.com/c6i8UP8H9G
— cricket.com.au (@cricketcomau) December 29, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">David Warner caps off an incredible 100th Test with the Johnny Mullagh Medal #AUSvSA pic.twitter.com/c6i8UP8H9G
— cricket.com.au (@cricketcomau) December 29, 2022David Warner caps off an incredible 100th Test with the Johnny Mullagh Medal #AUSvSA pic.twitter.com/c6i8UP8H9G
— cricket.com.au (@cricketcomau) December 29, 2022
सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरने (David warner ) कारकिर्दीतील 100 वा कसोटी सामना खेळताना द्विशतक झळकावून 3 वर्षांपासून सुरू असलेला शतकाचा दुष्काळ तर संपवलाच, (Aus vs SA Test) शिवाय आपल्या संघाला 386 धावांची आघाडीही मिळवून दिली. (AUS vs SA 2nd Test) पहिल्या डावात 386 धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत एक विकेट गमावून 15 धावा केल्या होत्या.
चौथ्या दिवशी, जेव्हा त्याने 15 धावांच्या पुढे खेळायला सुरुवात केली तेव्हा पहिल्या सत्रात त्याने 3 विकेट गमावल्या, नंतर उपाहारानंतर 6 विकेट गमावून तो सर्वबाद झाला. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने दुस-या डावात उपाहारापर्यंत 4 गडी गमावून 120 धावा केल्या होत्या, परंतु उपाहारानंतर त्यांना केवळ 84 धावांची भर घालता आली आणि 6 विकेट गमावल्या. ऑस्ट्रेलियाकडून, स्कॉट बोलँड (2 विकेट) आणि नॅथन लिऑन (3 विकेट) यांनी दक्षिण आफ्रिकेला 204 धावांत ( australia beat south africa by 1 innings ) गुंडाळले.
दक्षिण आफ्रिकेच्या टेम्बा बावुमा (65) आणि काइल वेरेन (33) यांनी पाचव्या विकेटसाठी 63 धावांची भागीदारी केली. बोटाच्या दुखापतीतून सावरत मिचेल स्टार्कने सरेल एरवीला (21) एलबीडब्ल्यू आऊट करून ऑस्ट्रेलियाला सकाळचे पहिले यश मिळवून दिले. त्यामुळे धावसंख्या दोन विकेटवर 47 धावा झाली. 10 धावांनंतर वेगवान गोलंदाज स्कॉट बोलंडने थ्युनिस डी ब्रुइन (28) याला दुसऱ्या स्लिपमध्ये झेलबाद केले, तर खाया जोंडो (एक) धावबाद झाल्याने चार गडी बाद 65 धावा झाल्या.
कॅमेरून ग्रीनच्या पाच विकेट्सच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेला १८९ धावांत गुंडाळले. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने सलामीवीर डेव्हिड वॉर्नरच्या द्विशतकी खेळी आणि एलेक्स कॅरीच्या १११ धावांच्या शानदार खेळीच्या जोरावर पहिल्या डावात ५७५ धावा करून डाव घोषित केला.