ETV Bharat / sports

World Archery Championship: भारताचा 'सुवर्ण' नेम; साताऱ्याची लेक अदिती 17 व्या वर्षीच बनली जागतिक चॅम्पियन, पंतप्रधानांकडून कौतुक

जागतिक तिरंदाजी चॅम्पियनशिपमध्ये भारतीय महिला संघाने अंतिम फेरीत मेक्सिकोचा पराभव करत सुवर्ण पदक मिळवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय महिला संघाचे अभिनंदन केले आहे.

World Archery Championship
Aditi Swami
author img

By

Published : Aug 6, 2023, 8:36 AM IST

Updated : Aug 6, 2023, 10:24 AM IST

नवी दिल्ली: जागतिक तिरंदाजी चॅम्पियनशिपमध्ये भारतीय महिला संघाने पहिल्यांदा सुवर्ण पदक जिंकत इतिहास घडवला. भारतीय महिला संघाची कामगिरीवर पंतप्रधान मोदी आनंदी झाले असून त्यांनी संघाचे कौतुक केले आहे. त्यांच्या कठोर परिश्रम आणि खेळावरील निष्ठेमुळे हे उत्कृष्ट यश मिळाले असल्याचे म्हणत पंतप्रधान मोदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे. यातून सर्वात मोठी अभिमानाची गोष्ट म्हणजे तीन जणांच्या संघात साताऱ्याची लेक आदिती स्वामीही होती.

तिरंदाज आदिती स्वामी अवघ्या 17 व्या वर्षात चॅम्पियन बनली आहे. दरम्यान बर्लिन येथे झालेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारतीय महिला एकत्रित संघाने अंतिम फेरीत मेक्सिकोचा पराभव केला. मेस्किकोचा पराभव करत भारतीय महिला संघाने पहिल्यांदा सुर्वणपदक जिंकून इतिहास रचला आहे. ज्योती सुरेखा वेन्नम, आदिती स्वामी परनीत कौर यांनी एकत्रित संघाने हा इतिहास घडवला आहे.

  • A proud moment for India as our exceptional compound Women's Team brings home India's first-ever gold medal in the World Archery Championship held in Berlin. Congratulations to our champions! Their hard work and dedication have led to this outstanding outcome. pic.twitter.com/oT8teX1bod

    — Narendra Modi (@narendramodi) August 5, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

17 व्या वर्षीच साधला चॅम्पियन टायटलवर निशाणा: आदितीने दोन महिन्यांपूर्वीच ज्यूनिअर वर्ल्ड टायटलवर निशाणा साधला होता. आता ती सीनियर चॅम्पियन देखील बनली आहे. 17 वर्षीय आदिती स्वामीने शनिवारी जागतिक तिरंदाजी चॅम्पियनशिपच्या कंपाऊंड(एकत्रित)संघाच्या अंतिम फेरीत मेक्सिकोच्या अँड्रिया बेसेरा हिला पराभूत केले. अँड्रियाला पराभूत करत आदितीने सीनियर वर्ल्ड चॅम्पियनचे शीर्षक आपल्या नावावर केले आहे. जुलैमध्ये लिमेरिक येथे झालेल्या 18 वर्षांखालील यूथ चॅम्पियनशिपची स्पर्धेत या साताऱ्याच्या लेकीने 150 गुणांपैकी 149 गुण मिळवले होते. या गुणांसह तिने मेक्सिकन खेळाडूला दोन गुणांनी मात दिली. अँड्रियाने उपांत्यपूर्व फेरीत विद्यमान चॅम्पियन सारा लोपेझला नॉकआउट केले होते. पण अँड्रियाला भारतीय खेळाडू आदितीकडून कठीण आव्हान मिळाले.

जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारताला पहिल्यांदाच सुवर्णपदक- आदिताने धमाकेदार सुरुवात करत तिच्या पहिल्या तीन बाणांनी मध्यभागाला बरोबर लक्ष्य केले. या अचून निशाण्यामुळे आदितीने 30-29 अशी पहिल्या फेरीत आघाडी घेतली होती. आदिती पहिल्या चार फेऱ्यांमध्ये सर्व 12 बाणांचा मारा करत तीन गुणांसह आघाडीवर होती. अंतिम फेरीत आदितीने तीनपैकी बाणांपैकी एक बाण लक्ष्यावर मारत 9 गुण मिळले. तिचा हा निशाणा तिला थेट वर्ल्ड चॅम्पियनकडे नेणारा ठरला. दरम्यान अदिती स्वामी, परनीत कौर आणि ज्योती सुरेखा वेन्नम यांनी महिला सांघिक अंतिम सामना जिंकला. हा सामना जिंकत त्यांनी भारताला जागतिक तिरंदाजी स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक मिळवून दिले.

पंतप्रधान मोदींकडून कौतुक: महिला तिरंदाज संघाचे पंतप्रधान मोदींनी अभिनंदन केले आहे.

आमच्या महिला संघाने बर्लिन येथे झालेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. हा भारतासाठी अभिमानाचा क्षण आहे. आमच्या चॅम्पियन्सचे अभिनंदन." त्यांचे कठोर परिश्रम आणि निष्ठेमुळे त्यांना हे उत्कृष्ट यश मिळाले आहे.

हेही वाचा-

  1. Sachin Tendulkar : क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी! पुन्हा एकदा रंगणार सचिन विरुद्ध अख्तर सामना, जाणून घ्या कधी आणि कुठे
  2. Sania Mirza And Shoaib Malik divorce : शोएब आणि सानिया पुन्हा एकदा चर्चेत; घटस्फोटाच्या बातम्यांनी पकडला जोर

Last Updated : Aug 6, 2023, 10:24 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.