ETV Bharat / sports

Union Budget 2022 : मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पात क्रीडा क्षेत्रासाठी 300 कोटींनी वाढ

author img

By

Published : Feb 2, 2022, 11:16 AM IST

काल सादर करण्यात आलेल्या 2022-23 अर्थसंकल्पात (Budget for 2022-23) क्रीडा क्षेत्राला 3062.60 कोटी (3062.60 crore grant to sports sector) अनुदान जाहीर करण्यात आले आहे. हा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी 2022-23 साठी जाहीर केला.

sports sector
क्रीडा

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Union Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी मंगळवारी 2022-23 साठी केंद्राचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये विविध क्षेत्रासाठी अनेक घोषणा आणि अनुदान जाहीर करण्यात आले. त्याचप्रमाणे निर्मला सीतारामन यांनी इतर क्षेत्रांबरोबर क्रीडा क्षेत्रासाठी देखील दिलासादायक अनुदान जाहीर केले आहे. ज्यामध्ये मागील वर्षापेक्षा तीनशे कोटींनी अधिक अनुदान जाहीर केले आहे. त्यामुळे आतापर्यंत क्रीडा क्षेत्राला देण्यात आलेले सर्वात जास्त आनुदान आहे. त्याचबरोबर नवनवीन योजना देखील आखण्यात आल्या आहेत.

कोरोना महामारीमुळे मागील दोन वर्षात इतर क्षेत्राप्रमाणे क्रीडा क्षेत्राला देखील मोठा फटका बसवला होता. ज्यामुळे बऱ्याच खेळाच्या स्पर्धा रद्द करण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर मागील वर्षी 2020-21 मध्ये क्रीडा क्षेत्राला देण्यात आलेल्या अनुदानात कपात करण्यात आली होती. गेल्या वर्षी अर्थसंकल्पात क्रीडा क्षेत्राला 2757.02 कोटी अनुदान देण्यात आले होते. ज्यामध्ये कोरोना महामारीमुळे कपात करुन 1878 कोटी केले गेले होते.

यंदा मात्र क्रीडा क्षेत्राला भरघोस अनुदान देण्यात आले आहे. 2022-23 साठी जाहीर केलेल्या ( Budget for 2022-23 ) अर्थसंकल्पात क्रीडा क्षेत्राला 3062.60 कोटीच्या अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे. कारण मागील वर्षी टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी केली होती. ज्यामध्ये भारतीय खेळाडूंनी एकूण 7 पदके मिळवली होती. गतवर्षी खेलो इंडिया स्पर्धेसाठी अर्थसंकल्पात 879 कोटींची तरतूद करण्यात आली होती. ज्यामध्ये यंदा भरघोस वाढ करताना ही रक्कम 974 कोटी करण्यात आली आहे.

मागील दहा वर्षात क्रीडासाठी जाहीर करण्यात आलेले सर्वात जास्त अनुदान आहे. दहा वर्षापूर्वी म्हणजेच 2012-13 च्या अर्थसंकल्पात 1151 कोटी केली होती. त्या तुलणेत यंदा देण्यात आलेले अनुदान जवळपास 2000 कोटी रुपयांनी जास्त आहे.

  • #AatmanirbharBharatKaBudget #KheloIndia has produced several sports stars for our country. With an increase in budget to Rs 1054 Cr in Yr 2022-23, we are even more determined to take Sports to every nook and corner of this country.

    " खेलेगा इंडिया तो खिलेगा इंडिया " ✌️😀 pic.twitter.com/S85WDKuQwc

    — Dept of Sports MYAS (@IndiaSports) February 1, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

क्रीडा क्षेत्रासाठी जाहीर करण्यात आलेले अनुदान क्रीडा मंत्रालय (Ministry of Sports) खेळाडूंच्या विकासासाठी वापरते. ज्यामध्ये फिटनेस, सराव, ट्रेनिंग, मैदाने आणि स्पोर्टस कॉम्प्लेक्स यांच्यासाठी हे अनुदान खर्च केले जाते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.