ETV Bharat / sports

गोवा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत अनुराग म्हामल, नितीश बेलुरकर यांची विजयी घौडदौड - CHESS TOURNAMENT

गोव्याच्या ताळगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये सध्या गोवा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा सुरू असून यात 24 देशातील 36 ग्रँडमास्टर सहभागी झाले आहेत.

गोवा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा
author img

By

Published : Jun 21, 2019, 2:28 PM IST

पणजी - ताळगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये सध्या गोवा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत गतविजेता इराणचा ग्रँडमास्टर इदानी पोवा आणि स्पर्धेतील अव्वल मानांकित ग्रँडमास्टर इतुरिजगा बोनेली यांनी दुसऱ्या फेरीअंती प्रत्येकी दीडगुणांची कमाई केली. तर फिडे मास्टर अनुज श्रीवास्तवने इतुरिजगा एदुआर्दोला बरोबरीत रोखले.

गोवा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा

गोव्याचा ग्रँडमास्टर अनुराग म्हामल आणि फिडे मास्टर नितीश बेलुरकर यांनी विजयी दौड कायम ठेवत दुसऱ्या फेरीअंती प्रत्येकी २ गुणांची कमाई केली. म्हामल गोव्याचा पहिला ग्रँडमास्टर आहे. बुधवारी रात्री उशीरा दुसरी फेरी संपली. तेव्हा अनुराग आणि नितीश या गोमंतकीय बुद्धिबळपटूंच्या खात्यात प्रत्येक दोन गुण जमा झाले होते. अनुरागने फिडे मास्टर सुयोग वाघचा 20 व्या चालीत पराभव केला. नितीश बेलुरकरने एम. ए. कुरेशी याला पराभूत केले. गोव्याच्या रित्वीज परब याने अनिल कुमारला बरोबरीत रोखले तर नीरज सारिपल्ली याने अर्पण दासचा पराभव केला. त्यामुळे दुसऱ्या फेरीनंतर नीरजच्या खात्यात 1 तर रित्वीजच्या खात्यात अर्धा गुण जमा झाला. तर लियॉन मेंडोसा आणि नंदिनी यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यांना प्रत्येकी एका गुणांवर समाधान मानावे लागले.

या स्पर्धेच्या 'ब' श्रेणीत पाच फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये पार्थ साळवी (1625) 4 गुणांसह 50 व्या स्थानावर आहे. साईराज वेर्णेकर (1591) साडेतीन गुणांसह 88 व्या स्थानी आहे. अनिरुद्ध पार्सेकर आणि रुबेन कुलासो यांनी प्रत्येकी साडेतीन गुणांची कमाई केली आहे. तर गुंजन चोपडेकर, आर्यन शामराव, एहटन वाज, साईश फोंडेकर, स्वयम नाईक आणि मंदार लाड प्रत्येकी 3 गुणांवर खेळत आहेत. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे 24 देशातील 36 ग्रँडमास्टर सहभागी झाले आहेत.

Intro:पणजी : गतविजेता इराणचा ग्रँडमास्टर इदानी पोवा आणि स्पर्धेतील अव्वल मानांकित ग्रँडमास्टर इतुरिजगा बोनेली यांनी दुसऱ्या फेरीअंती प्रत्येकी दीडगुणांची कमाई केली. तर फिडे मास्टर अनुज श्रीवास्तवने इतुरिजगा एदुआर्दोला बरोबरीत रोखले. ताळगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या गोवा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत त्यांनी ही कामगिरी केली.

Body:गोव्याचा ग्रँडमास्टर अनुराग म्हामल आणि फिडे मास्टर नितीश बेलुरकर यांनी विजयी दौग कायम ठेवत दुसऱ्या फेरीअंती प्रत्येकी दोन गुणांची कमाई केली. म्हामल गोव्याचा पहिला ग्रँडमास्टर आहे. बुधवारी रात्री उशीरा संपलेल्या दुसऱ्या फेरी संपली. तेव्हा अनुराग आणि नितीश या गोमंतकीय बुद्धिबळपटूंच्या खात्यात प्रत्येक दोन गुण जमा झाले होते. अनुरागने फिडे मास्टर सुयोग वाघचा 20 व्या चालीत पराभव केला. नितीश बेलुरकरने एम. ए. कुरेशी याला पराभूत केले. गोव्याच्या रित्वीज परब याने अनिल कुमारला बरोबरीत रोखले तर नीरज सारिपल्ली याने अर्पण दासचा पराभव केला. त्यामुळे दुसऱ्या फेरीनंतर नीरजच्या खात्यात 1 तर रित्वीजच्या खात्यात अर्धा गुण जमा झाला. तर लियॉन मेंडोसा आणि नंदिनी यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यांना प्रत्येकी एका गुणांवर समाधान मानावे लागले.
तर 'ब' श्रेणी स्पर्धेच्या पाच फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. यामध्ये पार्थ साळवी (1625) 4 गुणांसह 50 व्या स्थानावर आहे. साईराज वेर्णेकर (1591) साडेतीन गुणांसह 88 व्या स्थानी आहे. अनिरुद्ध पार्सेकर आणि रुबेन कुलासो यांनी प्रत्येकी साडेतीन गुणांची कमाई केली आहे. तर वूमन चेस मास्टर गुंजन चोपडेकर, आर्यन शामराव, एहटन वाज, साईश फोंडेकर, स्वयम नाईक आणि मंदार लाड प्रत्येकी 3 गुणांवर खेळत आहेत.

या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे चोवीस देशातील 36 ग्रँडमास्टर सहभागी झाले आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.