ETV Bharat / sports

देवेंद्र झाझरियासह 12 सदस्यीय भारतीय संघ टोकियो पॅराऑलिम्पिकसाठी रवाना - पॅरा अॅथलिट

अनुभवी देवेंद्र झाझरिया आणि विश्व चॅम्पियन संदीप चौधरीसह 5 भालाफेकपटू आणि इतर अॅथलिट मिळून 12 सदस्यीय भारतीय संघ टोकियो पॅराऑलिम्पिकसाठी आज बुधवारी रवाना झाला आहे.

12-member Indian contingent, including Jhajharia, departs for Tokyo Paralympics
देवेंद्र झाझरियासह 12 सदस्यीय भारतीय संघ टोकियो पॅराऑलिम्पिकसाठी रवाना
author img

By

Published : Aug 25, 2021, 3:39 PM IST

नवी दिल्ली - अनुभवी देवेंद्र झाझरिया आणि विश्व चॅम्पियन संदीप चौधरीसह 5 भालाफेकपटू आणि इतर अॅथलिट मिळून 12 सदस्यीय भारतीय संघ टोकियो पॅराऑलिम्पिकसाठी आज बुधवारी रवाना झाला आहे. दरम्यान टोकियो पॅराऑलिम्पिकला काल मंगळवारपासून सुरूवात झाली आहे. मंगळवारी सायंकाळी उद्घाटन सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला.

टोकियोसाठी रवाना झालेल्या 12 सदस्यीय संघात निषाद कुमार, रामपाल आणि योगेश कथुनिया यांचा समावेश आहे. निषाद उंच उडीत, रामपाल थाळीफेक क्रीडा प्रकारात भाग घेणार आहे. तर योगेश अॅथलिट आहे.

देवेंद्र झाझरिया टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये पदकाचा प्रबळ दावेदार आहे. त्याने एथेन्स आणि रिओ ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकले होते. तसेच त्याने जूनमध्ये पार पडलेल्या पात्रता फेरीत 65.71 मीटर लांब भाला फेकत आपल्याच विश्वविक्रमी कामगिरीत सुधारणा केली होती.

टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये देवेंद्र झाझरियाला आपल्याच देशाच्या अजित सिंह आणि सुंदर गुर्जर यांचे आव्हान मिळू शकते. नशिबाची साथ राहिली तर भारत या स्पर्धेतील पुरूष भालाफेक एफ-16 खेळामध्ये तीन पदक जिंकू शकतो.

नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुरूष भालाफेकीत सुवर्ण पदक जिंकले आहे. यामुळे आता टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये देखील अशाच प्रदर्शनाची आशा देशवासियांना आहे.

भालाफेकमध्ये पुरूष एफ-64 मध्ये संदीप चौधरी आणि सुमित एंतिल यांच्या कामगिरीवरही सर्वांच्या नजरा असणार आहेत. दरम्यान, टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये ट्रॅक अँड फिल्ड स्पर्धांची सुरूवात 27 ऑगस्टपासून होणार आहे. भारताचे 54 पॅरा अॅथलिट टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये भाग घेणार आहेत.

हेही वाचा - Paralympics Medal Tally: जाणून घ्या भारताने पॅराऑलिम्पिकमध्ये किती पदके जिंकली

हेही वाचा - टोकियो पॅराऑलिम्पिकविषयी काय म्हणाल्या दीपा मलिक?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.