नवी दिल्ली - भारतातील हॉकीप्रेमींसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. २०२३ मध्ये होणाऱ्या पुरुषांच्या हॉकी विश्वकरंडक स्पर्धेचे आयोजन भारत करणार आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (एफआयएच) यजमानपदाची घोषणा केली.
-
India to host 2023 FIH Hockey Men's World Cup
— ANI Digital (@ani_digital) November 8, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read @ANI Story | https://t.co/gGtFcVmUvZ pic.twitter.com/Nue4lFwrmy
">India to host 2023 FIH Hockey Men's World Cup
— ANI Digital (@ani_digital) November 8, 2019
Read @ANI Story | https://t.co/gGtFcVmUvZ pic.twitter.com/Nue4lFwrmyIndia to host 2023 FIH Hockey Men's World Cup
— ANI Digital (@ani_digital) November 8, 2019
Read @ANI Story | https://t.co/gGtFcVmUvZ pic.twitter.com/Nue4lFwrmy
हेही वाचा - नेमबाजी : भारतीय नेमबाजपटू चिंकी यादवने मिळवले ऑलिम्पिक तिकीट
भारत १३ ते २९ जानेवारी दरम्यान पुरुषांच्या हॉकी विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करणार आहे. तर, २०२२ मधील १ ते २२ जुलै दरम्यान होणाऱ्या महिला विश्वचषक स्पर्धेच्या सह-यजमानपदासाठी स्पेन आणि नेदरलँड्सची नावे जाहीर केली गेली आहेत. शुक्रवारी एफआयएसएचच्या वर्षाच्या शेवटच्या बैठकीत निर्णय हे घेण्यात आले.
'दोन्ही विश्वचषक स्पर्धेची ठिकाणे यजमान देश नंतर ठरवतील. या प्रतिष्ठित स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी एफआयएचला उत्कृष्ट निविदा प्राप्त झाल्या होत्या. म्हणून निवड करणे अवघड होते. एफआयएचचे प्राथमिक उद्दीष्ट जगभरातील खेळ वाढविणे हे आहे', असे एफआयएचचे सीईओ थिअरी वेइल यांनी सांगितले.